Header Ads

लवटेवस्ती(सनमडी)च्या शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई देऊ | कार्यकारी अभियंता विजय पाटील यांचे आश्वासन : सनमडीत बैठक


 




जत,प्रतिनिधी : लवटेवस्ती (सनमडी)येथील म्हैसाळ कालव्यात जाणाऱ्या घरांची नुकसान भरपाई योग्य पध्दतीने दिली जाईल असे आश्वासन म्हैसाळ योजनेचे पुणे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी दिले.

सनमडीतील लवटेवस्ती परिसरातील शेतकऱ्यांच्या घराचे मोठे नुकसान झाले होते.मात्र नुकसान भरपाई नियमानुसार न मिळाल्याने त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी काम बंद पाडले आहे.या भागाचे नेते तथा भाजपचे तालुकाध्यक्ष सुनिल पवार यांनी पुढाकार घेत शेतकरी व म्हैसाळ योजनेच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती.या बैठकीला म्हैसाळ योजनेचे कार्यकारी अभियंते पाटील,वरिष्ठ अभिंयते श्री.खरमाटे,शाखा अभिंयते अभिमन्यू मासाळ परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

लवटेवस्ती (सनमडी) येथील म्हैसाळ कालव्यामुळे नुकसान होणार्‍या घरांच्या अल्प व तुटपुंज्या नुकसान भरपाईच्या निषेधार्थ म्हैसाळ कालव्याचे काम लवटे कुटुंबिंयांकडून थांबविण्यात आले होते.यामुळे भाजपचे तालुकाध्यक्ष पवार,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष महादेव सलगर,डी.एस.सलगर,अमोल लवटे,भीमराव लवटे,व्हाईस चेअरमन बिरूआण्णा हुग्गे व नुकसानग्रस्त लवटे कुंटुबियाचे प्रतिनिधी यांनी प्रांताधिकारी प्रंशात आवटे यांची भेट घेऊन तक्रार नोंदविली होती.त्या तक्रारीनुसार लवटेवस्तीतील सर्व घरांचे मुल्यमापन शासकीय नियमांनुसार झाले नाही,मंजूर झालेली नुकसान भरपाई ही अत्यल्प व तोकडी आहे,कालव्यांमुळे नुकसान झालेली झाडे,फळबागा,पाईपलाईन यांचे योग्य मुल्यमापन केले गेले नाही.तसेच कालव्यांमुळे बाधित झालेल्या इतर अनेक घरांचे व गोठ्यांचे मुल्यमापन केले गेले नाही.अशा तक्रारी होत्या. यावेळी कार्यकारी अभियंते पाटील यांनी सर्व शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकूण घेत सर्व नुकसांनीचा योग्य मोबदला दिला जाईल.परत मुल्याकंन करू असे आश्वासन दिले.

 

 

सनमडी ता.जत येथील म्हैसाळ योजनेच्या कँनॉलमधील शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई मिळावी यासंदर्भात बैठक झाली.




 


Blogger द्वारे प्रायोजित.