Header Ads

उमदी | पोलीस,रुग्णवाहिकेचे टाळ्या वाजवून स्वागत 


उमदी,वार्ताहर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या जनता कर्फ्यूला उमदीकरांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आहे. सकाळपासून उमदीतील अत्यंत गजबजलेले सर्व रस्ते निर्मनुष्य दिसत आहे. त्यामुळे संपूर्ण उमदी शहरात सर्वत्र सन्नाटा पसरला आहे.गावातून जाणाऱ्या पोलीस गाड्या व रुग्णवाहिकेचे टाळ्या वाजवून स्वागत करत स्व:ताची काळजी घेणे पंसत केले.उमदीसह तालुक्यामध्ये अद्याप एकही कोरोनाग्रस्त रुग्ण सापडला नसला तरी या कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी आपली काळजी घेणे गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जतचे आमदार विक्रमसिंह सांवत यांनी अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नका, अशा प्रकारच्या सक्त सूचना नागरिकांना दिल्या आहेत.अत्यंत गजबजलेल्या चौक, सर्वच प्रमुख रस्ते निर्मनुष्य झाले आहेत.बस स्थानकावर शुकशुकाट दिसत आहे. 


उमदीसह तालुक्यातील मोठ्या शहरांमध्येही सकाळपासून प्रत्येक नागरिकाने घरात बसणे पसंत केले आहे. परंतु ग्रामीण भागातील काही गावांमध्ये शेतकऱ्यांनी  आपल्या शेतातील शेतीची कामे सकाळीच करून घेतली आहेत.


पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या जनता  कर्फ्यूमध्ये सहभागी होण्यासाठी  तालुक्याच्या ग्रामीण भागातील दूध डेरी चालकांनी सुद्धा दूध उत्पादकांना सकाळी पाच ते सात वाजेपर्यंत दूध घेऊन येण्याचे आवाहान केले होते. त्यानुसार तालुक्यातील व सर्व गावातील सकाळी सात नंतर सर्वच  दूध डेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत.  


 


 


उमदी ता.जत येथे जनता कर्फ्यू मुळे बसस्थानक चौक,मुख्य बाजारपेठ सुनसान होती.


 


Blogger द्वारे प्रायोजित.