Header Ads

जनता कर्फ्यू : जत तालुक्यातील पोलीस पाटीलही राबले





जत,प्रतिनिधी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देशवासियांना जनता कर्फ्यु पाळण्याचे आवाहन करण्यात आले होते.हा बंद संपुर्ण देशासोबत जत तालुक्यातील गावा गावात चोख पाळण्यात आला.या बंदसाठी पोलीसांच्या सोबतीने गावातील पोलीस पाटील रस्त्यावर उतरले होते.पोलीसांची कमी संख्या यामुळे पोलीस पाटलाच्या वर गावातील बंदचे कर्तव्य देण्यात आले होते.ते प्रत्येक गावातील पोलीस पाटलांनी सकाळपासून मध्यरात्रीपर्यत चोख बजावले.

सकाळपासून अनेक गावातील पोलिस पाटील रस्त्यावर उतरून लोकांना सूचना देऊन घरात बसायला सांगताना दिसत होते. अलीकडच्या दोन दिवसात पुणे, मुंबई शहरातून लोकांचे लोंढे गावात आले असून त्यामुळे भितीचे वातावरण तयार झाले असल्याने लोकांनी सतर्कता बाळगणे आवश्यक असल्याचे त्यांनी लोकांना समजून सांगितले. सायंकाळी पाच नंतर काही अतिउत्साही शहरी मुलांनी गावात फिरण्याचा प्रयत्न केल्यावर पोलीस पाटलांनी त्यांना घरी बसण्याच्या सूचना केल्या. यावेळी सरपंच, उपसरपंच यांनी वेळोवेळी आढावा घेत पुढील कर्फ्युच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी वेगळे आणि सुरक्षित राहण्याची विनंती केली आहे. 





 


 

Blogger द्वारे प्रायोजित.