Header Ads

उमदी | येथील विर मलकारसिध्द मंदिर दर्शनासाठी बंद


उमदी,वार्ताहर : उमदी ता.जत येथील श्री विर मलकारसिध्द देवाची मंदिर रविवार पासून नागरिकांना दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिराच्या पुजा-यांची बैठक घेऊन हा निर्णय घेतला. दर सोमवारी व आमावस्याला येथे महाराष्ट्र व कर्नाटकातील भाविकांची दर्शनासाठी येथे खुप गर्दी होत असते. म्हणून हा निर्णय घेण्यात आला. कोरोनाचा अनेक ठिकाणी प्रभाव वाढत आहे.त्यामुळे कोरोनाच्या विषाणू रोखण्यासाठी प्रतिबंधक जबाबदारी म्हणून मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे.  यासंदर्भात पुढील काही दिवस मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे असे मंदिराचे मुख्य पुजारी बनसिध्दा पुजारी यांनी सांगितले.


Blogger द्वारे प्रायोजित.