Header Ads

जनगणनेत लिंगायत धर्माची स्वतंत्र नोंद करा : सौ. मीनाक्षी आक्की

 


 

जत,प्रतिनिधी : सन 2021 च्या जनगणनेत धर्माच्या स्वतंत्र कालममध्ये लिंगायत धर्म अशी नोंद करून घ्यावी. जनगणनेच्या प्रगणकांना तशा सूचना देण्याची मागणी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ. मीनाक्षी आक्की यांनी केली आहे.

अक्की म्हणाल्या,बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वर यांनी अनुभव मंटपच्या माध्यमातून लिंगायत धर्माची स्थापना केली आहे. कर्नाटक,महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, केरळ, तेलंगणा, गोवा आदि राज्यात लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्माचा दर्जा मिळावा, त्याला सांविधानिक मान्यता मिळावी व अल्पसंख्यांकाचा दर्जा मिळावा यासाठी अनेक आंदोलने झाली. याची दखल घेऊन कर्नाटक शासनाने न्या.नागमोहनदास यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून अभ्यास करण्याची सूचना केली.त्यानंतर लिंगायत हा स्वतंत्र धर्म असून त्याला सांविधानिक मान्यता मिळावी, असा अहवाल केंद्र शासनाला पाठविला आहे.महाराष्ट्र शासनाकडेही तसा पाठपुरावा सुरू आहे. परंतु स्वातंत्र्यानंतर या धर्माची स्वतंत्र जनगणना झालेली नाही. धर्माची मान्यता काढून घेतली आहे.ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन नव्या जनगणनेत लिंगायत समाजबांधवांची नोंद स्वतंत्र धर्म म्हणून करण्याची मागणी त्यांनी केली.

 

 

Blogger द्वारे प्रायोजित.