Header Ads

देव कणाकणामध्ये आहे : विजय माने | बालगाव मध्ये सत्संग सोहळा 

 

 


 

बालगाव,वार्ताहर : आपण फक्त देवाला मंदिरामध्ये पाहतो सर्व धर्म ग्रंथांमध्ये देव हा सर्वव्यापक सर्व ठिकाणी कणाकणामध्ये आहे,अशी शिकवण आहे, असे प्रतिपादन एस्.जी.हायस्कुल व ज्युनियर काँलेज बेळोंडगी ता.जत येथे निरंकारी मंडळाचे वतीने आयोजित विशाल प्रचार सत्संग सोहळ्यामध्ये आदरणीय विजय माने ज्ञान प्रचारक आणि सेक्टर संयोजक खिळेगाव यांनी केले.

ते पुढे म्हणाले की,देव हा सगळीकडे आहे, पण त्यांची ओळख व्हायची असेल तर जिवनामध्ये वर्तमान सदगुरु येणे गरजेचे आहे जसे की जमीन आपली आहे.खाते उतारा पण आपल्या नावावर आहे जमीन स्वताच्या मालकीची असुन सुद्धा जमीनीमध्ये असलेले पाणी आपणास दिसत नाही त्यासाठी पाणी दाखविणाऱ्याची गरज असते तसे देव आपल्या अंगसंग सर्वठीकाणी आहे.पण देवाची ओळख करून घेण्यासाठी सदगुरुची गरज असते संत सांगतात परमात्मा हा चर्मदृष्टीने दिसत नाही. ज्ञानदृषृटीने दिसतो आज समयाला निरंकारी सदगुरु माता सुदिक्षाजी महाराज सर्व धर्म,ग्रंथ, शास्त्रानुसार ब्रह्मज्ञानाद्वारे कणाकणामध्ये व्याप्त असलेल्या देवाची ओळख करून देऊन जगामध्ये विश्वबंधुत्व शांती निर्माण करण्याचे महान कार्य करीत आहेत.फक्त एक श्रध्देचा नमस्कार करून देवांची प्राप्ती करून आपल्या जिवनाचे सार्थक करा असे सांगितले कार्यक्रम समाप्तीनंतर 168 जिज्ञासु भाविकांना ब्रह्मज्ञानाद्वारे देवाची ओळख करून देण्यात आली संचलन श्रीमंत बिराजदार यांनी केले.कार्यक्रमाच्या सुरवातीस बिराजदार परिवारातील गणेश व सविता यांचा विवाह साध्या स्वरुपात अनावश्यक खर्चाला फाटा देत निरंकारी पध्दतीने करण्यात आला.

सकाळच्या सत्रामध्ये निरंकारी भक्तांनी बेळोंडगी येथे स्वच्छता अभियान राबविले. अभियानाचे गावच्या सरपंच व नागरिकांनी कौतुक केले सत्संग कार्यक्रमास बेळोंडगी सरपंच कल्पना बुरुकले यांचेसह गावातील व तालुक्यातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते नियोजन स्थानिक मुखी यांचे मार्गदर्शन खाली बेळोंडगी,करजगी,जालिहाळ येथील निरंकारी संत महापुरुष सेवादल युनिट क्रमांक 1161 यांनी केले.

Blogger द्वारे प्रायोजित.