Header Ads

'कोरोना'ग्रामीण भागापर्यत अफवाचे पिक | कोबड्याची आठवड्या बाजारात विक्री :पाचशेची कोबडी 50 रूपयात

 



जत,प्रतिनिधी : गेल्या काही दिवसांपासून चीनमध्ये ‘कोरोना’ विषाणूने धुमाकूळ घातला आहे. या विषाणूची दहशत अवघ्या जगभरात पसरली आहे. नागरिकांमध्ये याबाबत भीतीचे वातावरण आहे. काही लोक जाणीवपूर्वक  सोशल मीडियावर अफवा पसरवत आहेत. कोरोनाचा धोका टाळायचा  असेल तर चिकन खाणे टाळा असे मेसेज छायाचित्रासहित ग्रामीण भागातपर्यत व्हायरल होत आहेत. परंतु चिकन खाल्ल्याने कोरोना होतो की चुकीची माहिती असल्याचे स्पष्ट झाले आहे.चिकन खाल्याने कोरोनाचा धोका असल्याची अफवा पसरवल्यामुळे ग्रामीण भागातील पोल्ट्री व्यवसायाला मोठा परिणाम झाला आहे. चीनसह अन्य देशात कोरोना व्हायरसचा फैलाव झाल्यानंतर  सोशल मिडियावर कोणतेही शास्त्रीय आधार नसलेल्या पोस्ट फिरत आहेत. यामुळे मांसाहारी नागरिकांनी कोरोनाचा धसका घेत कोंबडी व अंडी खाण्याकडे पाठ फिरवली आहे. 


कोबड्या 50 रूपयात बाजारात विकण्याची वेळ


जिल्ह्यातील पोल्ट्री व्यवसायिकांना कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.कोबड्याची मागणी घटल्याने पाचशे रूपयाची कोबडी पन्नास रूपयात एक स्थानिक बाजारात विक्री केली.जात आहे.


Blogger द्वारे प्रायोजित.