Header Ads

जत | तालुक्यात वाळू तस्करी जोमात | रिपाइचे महसूल मंञ्याना निवेदन

 


जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाने बेकायदा वाळू उपसा,व कार्यालयात जनतेची लूट सुरू आहे.यांची चौकशी करून संबधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशा मागण्याचे निवेदन रिपाइचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना पाठविण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे, जतचे प्रातांधिकारी प्रंशात आवटे, अप्पर तहसीलदार प्रंशात पिसाळ हे या वाळू तस्करी व कार्यालयातील खाबूगिरीकडे दुर्लक्ष करत आहेत.त्यांचा छुपा पांठिबा आहे.त्यामुळे जत तालुक्यात तूफान वाळू तस्करी सुरू आहे.अनेक गावात वाळूचे ढिगारे पडले आहेत.त्यामुळे शासनाच्या कोट्यावधी रूपयाचा महसूल बुडत आहे.त्याशिवाय जत महसूल व संख अप्पर तहसील कार्यालयात वाटणीपत्रे,विविध दाखले,व शासकीय योजनाचा लाभ देताना मोठ्या प्रमाणात लुट केली जात आहे.यावर या अधिकाऱ्यांकडून कारवाईची मागणी करूनही कारवाई केली जात नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.


Blogger द्वारे प्रायोजित.