Header Ads

डफळापूरकरांची पाणी टंचाईतून सुटका | पेयजल योजनेचे पाणी दाखल | उर्वरित कामे गतीने करू : दिग्विजय चव्हाण







 

 

डफळापूर,वार्ताहर : डफळापूर पेयजल योजनेतून गाव भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या आडात आज ता.10 पासून बसाप्पावाडी तलावातून वापर करण्यासाठीचे पाणी सोडण्यात आले.त्यामुळे पुढील तीन महिने डफळापूर करांची पाणी टंचाईतून मुक्तता होणार आहे.अखंडित विज पुरवठा,तांत्रिक अडचण न आल्यास या आडात दररोज पाणी सोडण्याची व्यवस्था आम्ही केल्याची माहिती पंचायत समिती सदस्य तथा लेखापाल समितीचे अध्यक्ष दिग्विजय चव्हाण यांनी दिली.

डफळापूर गावभाग व 26 वाड्या-वस्त्यासाठी असणाऱ्या या पेयजल योजनचे काम पुर्णत्वाकडे येत आहे. बसाप्पावाडी तलावात यावर्षी मुबलक पाणीसाठा असल्याने व भविष्यात या तलावात म्हैसाळ योजनेतून पाणी सोडण्यात येणार असल्याने पाणी पुरवठा खंडीत होणार नाही.सध्या बसाप्पावाडी ते डफळापूर आड येथेपर्यत पाणी सोडण्यात येत आहे. पाणी पुरवठा योजनेच्या पहिल्या टप्याचे काम पुर्ण झाले आहे.त्यामुळे बसाप्पावाडी ते डफळापूर असा सुमारे सात-आठ किलामीटर पर्यत पाणी आले आहे.तलावातून सध्या थेट पाणी उचलून ग्रामस्थांना वापरता येईल असे पाणी ग्रामपंचायतीच्या योजनेतून सोडले जाणार आहे.योजनेच्या अन्य टप्प्याची कामे सुरू करण्यात आली आहेत.शुध्दीकरण यंत्रणा,टाक्याचे उर्वरित कामे,शुध्द दाब नलिका,26 वाड्यावस्त्यांना पाणी पुरवण्यासाठी पाईपलाईन टाकणे आदी कामांना निधी उपलब्ध झाल्याने गती येणार आहे.प्राथमिक पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर ही तात्पुर्ती व्यवस्था केल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.

 

 

एकदिवसाआड पाणी पुरवठा करण़्याचे नियोजन

 

डफळापूर पेयजल योजनेच्या पहिल्या टप्यातून ग्रामपंचायतीच्या आडात व तेथून प्रादेशिक पाणी योजनेतून ग्रामस्थांना पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. दररोज पाणी सोडून गाव भागाला एक दिवस आड पाणी सोडण्याचे नियोजन आहे.सध्या हे पाणी फक्त वापरण्यासाठी आहे.लवकरचं शुध्दीकरण यंत्रणा पुर्ण करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.

 

 

दिग्विजय चव्हाण, सदस्य पंचायत समिती 



 

 




 

Attachments area

 


 



 



Blogger द्वारे प्रायोजित.