Header Ads

उमराणी | शाळेत डुकारांचा वावर | चिमुकल्याचे आरोग्य धोक्यात | शाळेचा बेजबाबदारपणा

उमराणी,वार्ताहर : उमराणी ता.जत येथे जिल्हा परिषद मराठी व कन्नड शाळेतील मध्यान्ह पोषण आहार शिजविण्याच्या किचन शेड समोर डुकरांचा वावर वाढला आहे.थेट मुले जवन करत असतानाही डुकरे त्यांच्या आजूबाजूला भटकत असतात.त्यामुळे शाळेतील मुलांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.उमराणीतील शाळेतील डुकरांच्या वावराबाबत शाळेतील शिक्षक उदासीन असल्याचे समोर आले आहे.अनेक वेळा जेवन करत असलेल्या चिमुकल्याच्या जवळ अशा डुकराचे कळप वावरत असतात.खाणारे डबे डुकरानी ओढून नेहल्याचीही उदाहरणे आहेत.असे घडत असतानाही डुकरे शाळेत येतात असे आम्ही ग्रामपंचायतीला कळविले आहे,असे मोघम उत्तर देऊन शाळेंनी जबाबदारी टाळली.दुसरीकडे गरीबाची मुले या मराठी शाळेत शिक्षत आहेत.नव्याने येत असलेले आजार व डूकरामुळे उद्भवणारे श्वाईन फ्लू सारखे गंभीर आजाराचे परिणाम सर्वज्ञात असतानाही हा बेजबाबदार चिमुकल्या मुलांना जीवघेणा ठरणारा आहे.भविष्यात अशा प्रकारांने काही आजार उद्भवलेच तर जबाबदार कोन असा प्रश्न उपस्थित होत आहे.
 

 

 

उमराणी शाळेत जेवन करणाऱ्या मुलांच्या जवळ वावरणारी डुकरे


 

  

Blogger द्वारे प्रायोजित.