जतेत जागेच्या कारणावरून हाणामारी | परस्पर विरोधी तक्रारी

जत,प्रतिनिधी : शहरातील आंबेडकर नगर येथे घर जागेच्या वादातून एकाने डोक्यात कोयता घातला.तर दुसऱ्याने दगडाने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली असून या घटनेत दोघे जण जखमी झाले आहेत. दोघांनी जत पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्याद दाखल केली आहे. रविवारी सकाळी 10 वाजता ही घटना घडली. जत पोलिसात घटनेची नोंद झाली आहे.चंद्रकांत बाबू कांबळे (वय 41) व शोभा वसंत कांबळे असे जखमी व्यक्तींची नावे आहेत. यामध्ये चंद्रकांत यांच्या फिर्यादीवरून वसंत कांबळे,पत्नी शोभा व मुलगा श्रेयस यांच्या विरोधात तर शोभा यांच्या फिर्यादी नुसार चंद्रकांत कांबळे व पत्नी अंजना यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सकाळी घराच्या जागेच्या वादातून दोघा कुटुंबात वाद सुरू झाला.

यात श्रेयस याने रागात ऊसतोडीचा कोयता चंद्रकांत यांच्या डोक्यात घालत, त्यांना जखमी केले. तर अंजना हिने दगडाने शोभा यांना मारून जखमी केले. दोघांच्या परस्पर फिर्यादी वरून गुन्हा दाखल झाला आहे.याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार विजय वीर व प्रशांत गुरव करत आहेत.