Header Ads

बाबरवस्ती | (पाडोंझरी)शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न 

संख,वार्ताहर : जिल्हा परिषद शाळा बाबरवस्ती(पाडोंझरी) शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले.या स्नेहसंमेलनास सहकार्य करणाऱ्या 101 मान्यवरांचे ट्रॉफी व आभारपत्र देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात विद्यार्थांनी देशभक्तीपर,हिंदी मराठी गाणी,नाटके,हास्यविनोद सादर केले.कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील,माजी सभापती आर.के.पाटील,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आण्णासाहेब गडदे,उपसभापती विष्णू चव्हाण,युवक नेते सुभाष पाटील,उपसंरपच नामदेव पुजारी, कॉग्रेसच्या महिला तालुकाध्यक्ष सलिमा मुल्ला, गोसलीया अध्यापक विद्यालयाचे अधिव्याख्याते उत्तम पांढरे,विकास माने,तुकाराम कोरे,रामचंद्र राठोड उपस्थित होते. विविध मान्यवरांची भाषणे झाली.सुत्रसंचालन चंद्रकांत कोळी,विशाल चिपडे,शाम राठोड यांनी केले.प्रास्तावित मुख्याध्यापक दिलीप वाघमारे,आभार अनिल पवार यांनी मानले.
 

 

जिल्हा परिषद शाळा बाबरवस्ती (पाडोंझरी)शाळेच्या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करताना जि.प.सदस्य सरदार पाटील व मान्यवर


 

 
 

 

 


  Blogger द्वारे प्रायोजित.