Header Ads

जमिनीच्या तुकड्यासाठी रक्ताचे पाट | जत तालुक्यात वादातून घडले अनेक हत्याकांड 







 

 

 

 


जत,प्रतिनिधी : दुष्काळी जत हा राज्यातील शेवटच्या टोकाचा तालुका,निम्मा भाग कर्नाटकच्या सिमेवर पाण्यासाठी देश स्वतंत्र झाल्यापासून संघर्ष कायम आहे. शेतीतील उत्पन्न तीन-चार वर्षातून एकादे वर्ष चांगले येते.जमिनीचे क्षेत्र मोठे आहे.मात्र गेल्या काही वर्षात या दुष्काळी तालुक्यात जमिनीच्या तुकड्यासाठी नात्याला काळीमा फासणारी,हत्याकांडे जतला हादरवून सोडत आहेत.उमदी येथे बुधवारी पुन्हा जमिनीच्या वादातून आई-वडीलासह बहिणीचा खून केला. पोटाच्या मुलांनेच जमिनीच्या तुकड्यासाठी तिघाचे बळी घेतले. यात तीन जीव गेलेच मात्र खून करणाऱ्या मुलांचेही आयुष्य जेलमध्ये बरबाद होणार आहे.उच्च शिक्षित कुंटुब असणाऱ्या गंवडी काम करणाऱ्या 56 वर्षाच्या सिध्दाप्पा अरकेरीने या मुलांने रक्ताच्या नात्यांला काळीमा लावणारे कृत्य केले आहे.गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेला वाद व आई-वडील जमिन विकतील या विचाराने डोक्यात सैतान शिरलेल्या मुलांने बुधवारी सकाळी वयोवृद्ध आई-वडील व रक्षा करण्याची गरज असणाऱ्या बहिणीच्या डोक्यात दाडक्यांने हल्ला चढविला.तिघांचे जीव गेल्यानंतर मुलांच्या डोक्यातील सैतान शांत झाला.या घटनेने पुन्हा जत तालुका हादरला आहे.यापुर्वीचे आंसगीतुर्क येथील पाच जणांचे जिवंत जाळण्याचे हत्याकांड, कुडणूर येथील चार जणांचे खून अशा घटना यानिमित्ताने नव्याने विचार करायला लावणाऱ्या ठरत आहेत.

राज्यातील अनेक तालुके समृध्द होत असताना जत तालुक्यातील ही सैतानी वृत्ती संपणार कधी असा प्रश्न उपस्थित होत आहे. तालुक्यातील न्यायालयात जमिनीचे अनेक खटले दाखल आहेत.त्याशिवाय महसूल अधिकाऱ्यांच्याकडे रस्ते, हद्द, वाटणीपत्र, वारसाच्या केसेस प्रंलबित आहेत. प्रशासनातील मोठा वेळ या जमिनीच्या केसेससाठी द्यावा लागत आहे.हि परिस्थिती बदलण्याची गरज उमदीतील हत्या काडानंतर निर्माण झाली आहे.

 

जमिनीच्या वादातून घडलेली तालुक्यातील हत्याकांडे

 


  • 22 मार्च 2005 रोजी गुढीपाडव्याच्या दिवशी आंसगीतुर्क येथे जमीनीच्या वादातून पाच जणांना जिंवत जाळण्यात आले होते.


 


  • सष्टेंबर 2016 मध्ये कुडणूर येथील भारत कुंडलिक इरकर यांने जमिनीच्या वादातून जन्मदात्या आईसह पत्नी आणि दोन मुलींची हत्या केली होती. 


 


  • घाटगेवाडी(रामपूर) येथे ऑगष्ट 2017 ला शेतजमिनीच्या वादातून बिरू बाबू ठवरे या शेतकऱ्यावर भावकीतील चौघानी दगड,काठ्या व कुऱ्हाडीने हल्ला करून खून केला होता. 


 


  • सुसलाद येथील शेत जमिनीच्या वादातून जून 2019 मध्ये चुलते वसंतराव उर्फ निंगाप्पा बन्नी यांचा पुतण्यांनी काठ्या,कुऱ्हाड,धारदार हत्याराने बेदम मारहाण करून खून केला होता.


 


  • डफळापूर येथील सागर बाळासाहेब डांगे यांचा जूलै 2019 मध्ये जमिनीच्या वादातून चुलत भावांनी लोंखडी रॉड,व कुऱ्हाडीेने डोक्यात वार करून खून केला होता.



 

 



 



 















ReplyForward







Blogger द्वारे प्रायोजित.