Header Ads

उमदी | तिहेरी हत्याकांडाने जत हादरले | उमदीतील घटना : जमिनीच्या वादातून मुलानेच आई,वडीलासह बहिणीला संपविले






सविस्तर वृत्त

 

उमदी/बालगाव,वार्ताहर : शेत जमिनीच्या वादातून मुलांने आई,वडील व बहिनीच्या डोक्यात दांडक्याने हल्ला करत निर्घण खून करत तिहेरी हत्याकांड घडविल्याचा प्रकार बुधवारी उघडीस आला.उमदी पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर अरकेरी वस्तीवर ही ह्रदयद्रावक घटना घडली.बुधवारी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

खून केल्यानंतर संशयित आरोपी पोलीसात हजर झाला आहे.आई नागव्वा गुरलिंगाप्पा अरकेरी (वय 75), वडील गुरलिंगाप्पा आण्णाप्पा अरकेरी (वय 82) व बहिण समुद्राबाई शिवलींगाप्पा बिराजदार (वय 62, सर्व रा.उमदी) असे खून झालेल्या तिघाचे नाव आहे, तर सिदाप्पा गुरूलिंगाप्पा अरकेरी (वय 58,रा.उमदी) असे संशयित आरोपीचे नाव आहे.याबाबत उमदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

     जत तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडवून देणाऱ्या घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट दिली.रात्री उशिरापर्यत पोलीसाकडून तपास सुरू होता.

पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की,गुरलिंगाप्पा अरकेरी यांची उमदी ते चडचण रस्त्यावर सहा एकर व जत रस्त्यावर बारा एकर अशी शेतजमीन आहे.गुरलिंगाप्पा यांना समुद्राबाई ही मुलगी व संशयित आरोपी सिदाप्पा हा मुलगा आहे.ते पत्नी,मुलगी जत रोडवरील जमिनीत राहतात.तर मुलगा त्यांच्यापासून वेगळा गावात त्यांची पत्नी व मुलासह राहतो.जमिनीतील चार एकर जमिन संशयित आरोपीच्या नावे आहे.आरोपी सिदाप्पा हा आई वडिलांचा सांभाळ करत नव्हता.सिदाप्पा हिची पहिली पत्नी ही बहिण समुद्राबाई यांची मुलगी होती. बहिण समुद्राबाई बिराजदार हिचे सासर मंगळवेढा तालुक्यातील सोड्डी आहे.तिच्या पतीचे निधन झाल्यानंतर गेल्या अनेक वर्षांपासून उमदी येथे आई वडील यांच्या सोबत राहत होती. 

दरम्यान,सिदाप्पाची पहिली पत्नी हिचा दुरधर आजाराने एक महिन्यापूर्वी मृत्यू झाला होता.तिच्या मुत्यू होताच महिन्याभरात त्याने दुसरा विवाह केला होता.दुसरीकडे आई-वडिलांचा आजारपणात भावकीतील संतोष अरकेरी याने पाच ते सहा लाख रुपयाचा खर्च केला होता.याबदल्यात गुरलिंगाप्पा यांनी संतोष याच्या नावे चडचण रस्त्यावरील सहा एकर जमीन एक वर्षापूर्वी नावावर करून दिली आहे.याचा राग आरोपी सिदाप्पा याच्या मनात होता.हा वाद गावातील पंचांनी मध्यस्थी ही करत मिटवला होता.

सध्या जत रस्त्यावरील बारा एकर जमीन आहे.त्यापैकी चार एकर जमीन संशयित आरोपी सिदाप्पा याच्या नावावर आहे. उर्वरित जमीन आई-वडील मला देणार नाहीत,तिही दुसर्‍याला देतील,या भितीने संशयित आरोपी सिदाप्पा याने आई नागव्वा,वडील गुरलिंगाप्पा अरकेरी व बहिण समुद्राबाई बिराजदार यांनाच कायमचे संपवले. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.घटनेनंतर संशयित आरोपी सिदाप्पा याला पोलिसांनी अटक केली आहे.अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर करत आहेत.

 

 




 


Blogger द्वारे प्रायोजित.