Header Ads

चिकलगी भूयार | राज्यातील दुसरा जगद्गुरु तुकाराम महाराज बीज व वैकुंठ गमन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न


  • चिकलगी(ता.मंगळवेढा)श्रीसंत सद्गगुरू बागडे बाबा महाराज तपोवन रेवनसिध्द येथे राज्यातील दुसरा जगद्गुरु तुकाराम महाराज बीज व वैकुंठ गमन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न


 

 


  • हभप तुकाराम महाराज यांचे नियोजन


 

 



  • रक्तदान,आरोग्य तपासणी शिबिर व हभप तुकाराम महाराज यांचे काल्याचे कीर्तन असे कार्यक्रम पार पडले. 



सोन्याळ,वार्ताहर : चिकलगी (ता.मंगळवेढा) येथे श्री संत सद्गुरू बागडे बाबा महाराज तपोवन रेवनसिद्ध चिक्कलगी भुयार येथे तुकाराम बीजनिमित्त जगद्गुरु तुकाराम महाराज बीज व वैकुंठ गमन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. 

या कार्यक्रमानिमित्त रक्तदान,आरोग्य तपासणी शिबिर व हभप तुकाराम महाराज यांचे काल्याचे कीर्तन

असे कार्यक्रम पार पडले. 

या कार्यक्रमाचे संयोजक गोंधळेवाडी( ता.जत) येथील श्री संत बागडेबाबा यांचे शिष्य तुकाराम महाराज यांनी केले.

चिकलगी येथील श्रीसंत सद्गुरू बागडे बाबा तपोवण रेवनसिद्ध चिक्कलगी भूयार मठात सालाबादप्रमाणे महाराष्ट्रातील दुसरा भव्य तुकाराम बीज कार्यक्रम हाजारो भक्ताच्या उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी आयोजित रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.लवंगा येथील कै. रामचंद्र माने सरकार यांच्या पत्नी व शिवराय हताळे (भुयार) यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले.बागडे बाबांचे शिष्य 5 गणांचा कीर्तनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर भुयार मठाचे मठाधिपती हभप तुकाराम बाबा यांचे कीर्तन झाले.

दिनांक 11 मार्च रोजी सकाळी 9 वाजता काल्याचे किर्तन ठीक 12 वाजता पुष्प अर्पण व महाप्रसादाचा कार्यक्रम झाला.या कार्यक्रमांमध्ये कीर्तनकार अमृत पाटील महाराज जालिहाळ, महादेव हहिप्परकर(पौट) युवराज शिंदे महाराज (चिकलगी),बसवंत चौगुले (भोसे),पात्रे महाराज(निंबोनी),तुकाराम महाराज(मानेवाडी),शिवराया हाताळे(भुयार),भारत खांडेकर,सुखदेव येडवे (बावची),कुलकर्णी महाराज (निंबोनी), होनमाने महाराज(हुन्नूर),म्हातारबा महाराज( लवंगी),सखुबाई नरळे महाराज,राजगुरू महाराज(भोसे),अशोक बुवा ढगे महाराज (निंबोणी),साठे महाराज (असबेवाडी) यांचे कीर्तन झाले.दुपारी 12 वाजता फुले, गुलाल व कार्यक्रमाची सांगता झाली.तुकाराम बीज महाप्रसादासाठी पुणे येथील रेखा इंटरप्राईजेस व श्रीहरी प्रतिष्ठान येथील एस.डी.भोसले,उद्योजक प्रदीप वालेकर,बाळासाहेब सातव( वाघोली पुणे),पुणे येथील उद्योगपती सी.आर.सांगलीकर, बबनराव आवताडे,माजी शिक्षण क्रीडा व आरोग्य सभापती सांगली जिल्हा परिषदेचे तमन्नगोडा रवीपाटील, संत दामाजी साखर कारखान्याचे चेअरमन समाधान अवताडे, पंचायत समितीचे सदस्य नितीन पाटील,रतनशहा अर्बन बँकेचे चेअरमन राहूल शहा,अजिंक्यतारा प्रतिष्ठानचे प्रभाकर जाधव (जत),चिक्कलगीचे सरपंच दिनेश पाटील,प्रगतशील शेतकरी विठोबा गारळे यांचे सहकार्य लाभले.


Blogger द्वारे प्रायोजित.