Header Ads

उमदी| अवकाळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी | ना.जयंत पाटील यांच्याकडे फिरोज मुल्ला यांची मागणी


 

 

उमदी,वार्ताहर : गेल्या चार दिवसापुर्वी उमदी परिसरात अवकीळीने बेदाणा,द्राक्षे,डांळीब,आंबा,ज्वारीसह विविध पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.यात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई मिळावी यासाठी उमदीचे युवक नेते फिरोज मुल्ला यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेत निवेदन दिले.निवेदनात म्हटले आहे की,रब्बीचा हंगाम ऐन भरामध्ये आहे.द्राक्षाचा हंगामही गतीने सुरू आहे. परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात बेदाणासाठी द्राक्षे सेडवर टाकली आहेत. त्यातच गेल्या चार दिवसापुर्वी अवकाळी पावसाने तडाका दिला.त्यामुळे बेदाण्यासह द्राक्ष,ज्वारी,गहू पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.त्यांचे पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मुल्ला यांनी ना.पाटील यांच्याकडे केली. परिसरातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची यादी व नुकसानीचे फोटोही ना.पाटील यांना देण्यात आले. दरम्यान शासनाकडे याबाबत माहिती पोहचवू असे ना.पाटील यांनी आश्वासन दिल्याचे मुल्ला यांनी सांगितले.  


 

 

उमदी परिसरात अवकाळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची माहिती ना.जयंत पाटील यांना देताना फिरोज मुल्ला व मान्यवर 

Blogger द्वारे प्रायोजित.