Header Ads

संख | मधिल विरभद्रपा हलकुडे दांपत्यांचा सत्कार

 

संख,वार्ताहर : संख (ता.जत)येथील  वीरभद्रपा शिवपुत्रप्पा हलकुडे यांचा निवृत्ती सत्कार समारंभ संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी म.नि.प्र. मुरगेद्र महास्वामीजी तर प्रमुख उपस्थिती श्री.प्र.ब्र.गुरपाद शिवाचार्य स्वामीजी संस्थान हिरेमठ गुड्डापुर, हेश्वर देवरू,जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष बसवराज पाटील,माजी पंचायत समिती सभापती आर.के.पाटील,जत मार्केट कमिटी सभापती दयगोंडा बिरादर,संखच्या सचरपंच सौ.मगंलताई पाटील,सोसायटीचे माजी चेअरमन मलिकार्जुन सायगाव,रुद्रगोंड बिरादार, अण्णासाहेब गडदे,राजेद्र कन्नूरे,राजेद्र हलकुडे,अनिल सायंगाव,मलिकार्जुन हलकुडे,बालचंद्र वाली आदी मान्यवर उपस्थित होते.प्रस्ताविक उमेश कोठ्याळ यांनी केले.

विरभद्रपा हलकुडे हे बी.एस.एन.एल. सांगली येथे कार्यरत होते. दिनांक 31 जानेवारी 2020 रोजी निवृत्त झाले. त्यानिमित्त हलकुडे दांपत्याचा सत्कार श्री.प्र.ब्र. गुरूपाद शिवाचार्य स्वामीजी यांच्याहस्ते करण्यात आला.हलकुडे यांनी 31जानेवारी 1982 रोजी पासून आजपर्यंत 38 वर्ष सेवा केली आहे.आपल्या कामाचे प्रामाणिकपणे कार्य जपले. संखच्या विनायक तरुण मित्र मंडळाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केले होता.प्रमुख नेते,पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार मल्लीकर्जून हलकुडे यांनी मानले.

 

https://youtu.be/NwMNmbj2_P4

 

संख ता.जत येथील विरभद्रपा हलकुडे दांपत्यांचा सत्कार करताना प्र.ब्र. गुरूपाद शिवाचार्य स्वामीजी,बाजूस बसवराज पाटील,आर.के.पाटील


 

  

Blogger द्वारे प्रायोजित.