Header Ads

उमदी | कोरोना मुळे अखेर उमदीची यात्रा रद्द 


 

उमदी,वार्ताहर : जत तालुक्यातील उमदी येथील श्री मलकारसिध्द देवाची यात्रा अखेर रद्द करण्यात आली.दि.27 मार्चला यात्रा भरविण्यात येणार होती.मात्र कोरोना संसर्ग आजाराचा धोका व जिल्हाधिकारी यांनी केलेल्या आवाहन यामुळे ही यात्रा रद्द करण्यात आल्याचे सोमवारी बैठकीत जाहीर करण्यात आले. 

उमदी पोलिस ठाण्यात यात्रेसंदर्भात सोमवारी उमदी ग्रामपंचायत व यात्रा कमिटीचे सदस्यांची यांची बैठक पोलिस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत कोरोना आजाराचा फैलाव वाढू नये यासाठी जिल्हाधिकारी यांनी यात्रा व उरूस यावर बंदी घातली आहे. त्यामुळे यात्रा पुढे ढकलण्यात यावी, असे आवाहन पोलिस निरीक्षक कोळेकर यांनी केले. अन्यथा आम्हाला गुन्हे दाखल करावे लागतील असा इशारा दिला. ग्रामपंचायत व यात्रा कमिटीने जिल्हाधिकारी यांच्या आवाहनास प्रतिसाद देत यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी सरपंच वर्षा शिंदे,कॉग्रेसचे नेते निवृत्ती शिंदे,उपसंरपच रमेश हळके,वहाब मुल्ला,युवक नेते फिरोज मुल्ला,पाणी संघर्ष समितीचे सुनिल पोतदार,डॉ.पवार,डॉ.गुरव,डॉ.लोणी,बाबूराव सांवत,मानसिध्द पुजारी,आमगोंडा पाटील,संगाप्पा माळी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

 

 

उमदी ता.जत येथे यात्रा कमिटी व पोलीसांची बैठक संपन्न झाली.
 


Blogger द्वारे प्रायोजित.