Header Ads

जत | महिला बचत गटांना फिरता निधी देण्यास जत नगरपरिषदेची टाळाटाळ | विक्रम ढोणे | चौकशीची मागणी


 




महिला बचत गटांना फिरता निधी देण्यास जत नगरपरिषदेची टाळाटाळ

 

 विक्रम ढोणे : चौकशीची मागणी

 

 

जत,प्रतिनिधी : महिला आर्थिक विकास महामंडळ मार्फत स्थापन झालेल्या पात्र महिला बचत गटांना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान कार्यक्रमांतर्गत फिरता निधी बचत गटांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून देणे बंधनकारक असते,तरीही जत नगरपरिषद हा फिरता निधी बचत गटांना देण्यास टाळटाळ करत आहे,याची जिल्हास्तरीय सक्षम अधिकाऱ्यांमार्फत सखोल चौकशी करून संबंधितावर कठोर कारवाई करावी,अशी मागणी युवा नेते विक्रम ढोणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

शहरातील अनेक लोक हे आर्थिक दुबल जीवन जगत आहेत.महाराष्ट्र राज्य पुरोगामी राज्य असल्याने सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या विकासासाठी त्यांना दारिद्रय रेषेवर आणून त्यांच्या जीवनमानाचा स्तर उंचावण्यासाठी शासनाने दारिद्रय निवारण करणे हे स्थानिक स्वराज्य संस्थाना बंधनकारक कर्तव्य म्हणून घोषित केले आहे.केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने नागरी क्षेत्रातील दारिद्रय निवारण्यासाठी स्वावलंबन घडवून आणण्यासाठी राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या माध्यमातून पात्र महिला बचत गटांना फिरता निधी देण्यात येतो.तो निधी देण्याची व पात्र गटाची यादी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अंतर्गत क्रांती लोकसंचलित साधना केंद्र जत यांनी जत नगरपरिषदेला तब्बल पाच पत्रे दिली आहेत.तरीही नगरपालिका प्रशासन फिरता निधी देण्यास टाळटाळ करते,ही बाब फार गंभीर आहे.गेल्या वर्षीही आम्ही आवाज उठवल्यानंतर 13 बचत गटांना फिरता निधी दिला त्यानंतर वर्षभरात एकाही गटाला निधी दिला नाही.तब्बल 45 प्रस्ताव बचत गटांचे आणि 2 प्रस्ताव वस्तिस्तर संघाचे जमा आहेत.मात्र निधी देण्यास जाणीव पूर्वकच टाळाटाळ केली जाते. विशेष म्हणजे नगरपालिकेच्या प्रमुख नगराध्यक्षा महिला,नगरपालिकेत 50 टक्के महिला प्रतिनिधी महिला आहेत.जिल्हा नगरविकास अधिकारी सुद्धा महिला आहेत.तरीही महिला बचत गटांच्या हक्काचा फिरता निधी मिळत नाही हेच दुर्दैव म्हणावे लागेल.

जागतिक महिला दिनानिमित्त एकच दिवस महिला सक्षमीकरण,स्वावलंबी व महिला सन्मानाच्या गप्पा मारल्या जातील पण महिलांच्या हक्काचा फिरता निधी न देऊन महिला सक्षमीकरण, महिलांचा सन्मान,महिला स्वावलंबी  शासन व प्रशासन,लोकप्रतिनीधी कसे 

करणार आहे, हा एक मोठा प्रश्न आहे.

केंद्र व राज्य शासनाच्या धोरणाला चुना लावणाऱ्या यंत्रणेची सखोल चौकशी करून सेवा हमी कायद्यानुसार त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी युवा नेते विक्रम ढोणे यांनी केली आहे.

 

 

 

जत शहरात महिलासाठी स्वच्छालय उभे करून खऱ्या अर्थाने महिलांचे रक्षण करणे गरजेचे आहे.त्यासाठी आम्ही वेळोवेळी निवेदने दिली आहेत.समस्त महिलांचा एक प्रकारे सन्मान करण्यासाठी स्वच्छालये उभारावीत, तरच जागतिक महिला दिन खऱ्या अर्थाने साजरा केल्यासारखा होईल.




 


 

Blogger द्वारे प्रायोजित.