Header Ads

जत | शिवार कृषी प्रदर्शनाला तूफान प्रतिसाद | आज शेवटचा दिवस


 




शिवार कृषी प्रदर्शनाला तूफान प्रतिसाद


 


आज शेवटचा दिवस :शेती,उद्योग,अवजारे, मग पुस्तकेसह शेकडो स्टॉल


जत,प्रतिनिधी : शिवार मालिकेतील जत तालुक्यातील पहिल्या कृषी प्रदर्शनाला जत येथे चार दिवसापुर्वी सुरुवात झाली असून कृषी प्रदर्शनाच्या दुसरा,तीसरा,व चौथ्या दिवशी जतकरांचा तूफान प्रतिसाद लाभला.शेतकऱ्यांनी प्रदर्शन पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.आज प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे.


जत तालुक्यात प्रथमच भरलेल्या या प्रदर्शात तालुक्यातील शेतकरी गटा-गटाने प्रदर्शन पाहण्यासाठी येत आहेत. प्रदर्शनात राज्य,जिल्हा कंपन्यांसह,राष्ट्रीय कंपन्यांची कृषीआधारित उत्पादनांची दालने उभी करण्यात आली आहेत. हे कृषी प्रदर्शन आज रविवार (8 डिसेंबर) पर्यंत सुरू राहणार आहे. कृषी प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी आधुनिक यंत्र, ट्रॅक्टर, वीजपंप, ठिबक सिंचन संच,पुस्तके,रोपे,औषधे यांची मांडणी करण्यात आली आहे. पिकांच्या विविध जाती आणि त्यांचे बी-बीयाणे आदींचीही दालने सर्वाधिक संख्येने पहायला मिळत आहेत. याशिवाय राज्य शासनाच्या विविध विभागांची दालनेही मार्गदर्शनासाठी तयार करण्यात आली आहेत. तसेच शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या अ‍ॅपची माहिती देणारी दालने शेतकऱ्यांना आकर्षित करत आहेत.पंधरा ते वीस हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आतापर्यत कृषी प्रदर्शनाला भेट दिली.चार एकर जागेमध्ये प्रदर्शन भरले असून पाचशेपेक्षा अधिक कंपन्या, संशोधन संस्था, नव उद्योजकांनी त्यात भाग घेतला आहे. शेतीतील नवीन तंत्रज्ञान व उत्पादने प्रदर्शनात सादर करण्यात आली आहेत. यंदाच्या कृषी प्रदर्शनामध्ये संरक्षित, पाणी नियोजन, शेतीशी संबंधित यंत्रसामग्री, शेती व लघु उद्योग अशी दालने तयार करण्यात आल्याची माहिती संयोजक स्वा.शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिली.


 


जत शहरात भरलेल्या शिवार प्रदर्शनास शनिवारी लाभलेला तूफान प्रतिसाद





 


 

Blogger द्वारे प्रायोजित.