Header Ads

संत भीमदास महाराज करांडे हायस्कुलमध्ये दहावी विद्यार्थ्यांचा निरोप


 
संत भीमदास महाराज करांडे हायस्कुलमध्ये दहावी विद्यार्थ्यांचा निरोप

 

येळवी,वार्ताहर : जत तालुक्यातील खैराव येथे संत भीमदास महाराज करांडे हायस्कूलमध्ये दहावी विद्यार्थ्यांचा निरोप देण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री.मुंजे सर तर प्रमुख पाहुणे म्हणून भारत शिरसागर होते.

यावेळी क्षीरसागर म्हणाले,आजच्या धकाधकीच्या काळात विद्यार्थ्यांनी स्वयंप्रेरणेने यश संपादन करावे,सर्वांनी आत्मविश्वासाने येणाऱ्या परीक्षेला सामोरे जावे,यश निश्चित मिळेल.आपल्यामध्ये स्वयंप्रेरणा ठेवा व जीवनात यशस्वी होण्यासाठी जिद्द,चिकाटी,प्रामाणिकपणा व आत्मविश्वास असला पाहिजे. आपल्यामध्ये असलेल्या कलागुणांना जागृत करा व त्या कलेला वाव द्या. आपली शाळा,आई,वडील व गावाबद्दल आदर ठेवा.

यावेळी विद्यार्थ्यांची भाषणे झाली.टोणे सर,बिराजदार सर,उदगीर सर वनिमंगरे सर यांनीही मार्गदर्शन केले.

 

 

 


येळवी : संत भीमदास महाराज करांडे हायस्कुलमध्ये दहावी विद्यार्थ्यांचा निरोप देण्यात आला.

 

 


Blogger द्वारे प्रायोजित.