Header Ads

व्यापारी नोंदणी की लुटीचा उद्योग महापालिकेच्या नोंदणीला शिवसेनेचा विरोध


 




व्यापारी नोंदणी की लुटीचा उद्योग महापालिकेच्या नोंदणीला शिवसेनेचा विरो

 

सांगली : महापालिका क्षेत्रातील व्यवसायिकांना महापालिकेने नोंदणी सक्तीची केली असून त्यासाठी पाचशे रुपयापासून 28 हजार रुपयांपर्यंतची रक्कम फी चे नावाखाली उकळण्याचा कारभार राजरोसपणे सुरू केला आहे. त्याला शिवसेना तीव्र विरोध करणार असल्याची घोषणा आणि व्यापाऱ्यांनी घाबरून नोंदणी न करण्याचे आवाहन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शंभूराज काटकर यांनी केले आहे.सर्वसामान्य पानपट्टी चालकाला पाचशे रुपये,दूध विक्रेत्याला हजार रुपये, बेकरी विक्रेत्याला पाच हजार रुपये प्रत्येक वर्षाची फी आणि याच पद्धतीने वेगळ्या व्यापाऱ्यांना 28 हजार रुपयांपर्यंतची नोंदणी फी महापालिकेने लावली आहे. या नोंदणीला फी म्हणावे की जिझिया कर असा प्रश्न पडतो आहे. महापालिका क्षेत्रातील सर्व व्यापाऱ्यांचे याप्रश्नी प्रबोधन करून शिवसेना नोंदणीला तीव्र विरोध करणार असून व्यापाऱ्यांनी महापालिकेच्या नोंदणीला प्रतिसाद देऊ नये असे आवाहन शंभूराज काटकर यांनी केले आहे.आपल्या पत्रकात काटकर यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकारच्या वतीने व्यापाऱ्यांची कोणतीही नोंदणी अवघ्या शंभर रुपयात होते.  अन्न आणि औषध प्रशासनाच्या नोंदणीला पाच वर्षांसाठी पाचशे रुपये लागतात. तर महाराष्ट्र शासन अवघ्या बत्तीस रुपयांमध्ये कायमस्वरूपी व्यवसायाचे लायसन देते. ही लायसन फी अत्यल्प ठेवण्यामागे लोकांनी स्वतःचा रोजगार निर्माण करावा, त्यामध्ये विविध लोकांना नोकरी द्यावी आणि देशाच्या व्यवसायिक प्रगतीला हातभार व्हावा हा उद्देश असतो. सांगली महापालिकेला आपण नोंदणी करतो, परवानगी देतो याचा अर्थ लोकांच्यावर फार मोठा उपकार करतो असा भास झालेला असावा आणि त्यामुळेच कचरा उठवण्याचा जनतेकडून अव्वाच्या सव्वा पैसा वसूल करण्यापासून व्यापार्‍यांच्या नोंदणी लाही पाचशे ते 28 हजार रुपये करण्यापर्यंत त्यांचे धाडस चालले आहे. महापालिकेत नगरसेवक आणि लोकनियुक्त बॉडी आहे का नाही? त्यांना जनतेची प्रश्न समजतात की नाही? असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण होतो आहे. आपण या लोकांना का निवडून दिले असा लोकांना प्रश्न पडत आहे. जनतेची थोडीतरी चाड असेल तर महापालिकेतील सर्व नगरसेवकांनी लोकांच्या लुटीच्या उद्योगाला पक्षीय दृष्टीकोन बाजूला ठेवून तीव्र विरोध करावा. त्यांना जर प्रशासनाला बोलायचे जमत नसेल तर राजीनामा देऊन घरात बसावे. लोकांच्या लूटीला मूकसंमती देणाऱ्या सर्वपक्षीय नगरसेवकांचा  शिवसेना निषेध करत आहे. असेही शंभूराज काटकर यांनी पत्रकात म्हटले आहे.महापालिका क्षेत्रातील सर्व व्यापारी संघटना, छोटे-मोठे व्यवसायिक व्यवसाय करणारे व्यवसायिक या सर्वांची एक व्यापक बैठक घेऊन प्रसंगी या विषयावर आंदोलन उभे करण्याची शिवसेनेची तयारी आहे. मात्र व्यापाऱ्यांनी आपल्यावर कारवाई होईल अशा भीतीपोटी कोणत्याही परिस्थितीत महापालिकेच्या नोंदणीला बळी पडू नये किंवा दबावाला घाबरून पैसे भरू नयेत. शंभर रुपयांचा फॉर्म ही खरेदी करू नये असे आवाहनही काटकर यांनी केले आहे.




 


Blogger द्वारे प्रायोजित.