Header Ads

उमदी | जि.प.गटातून काँग्रेकडून विकास लेंगरे यांना उमेदवारी देण्याची मागणी


 
उमदी जि.प.गटातून काँग्रेकडून विकास लेंगरे यांना उमेदवारी देण्याची मागणी

 

 

सोन्याळ,वार्ताहर : येत्या काही दिवसात होऊ घातलेल्या उमदी जिल्हा परिषद  पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसची उमेदवारी धनगर समाजातील युवकांचे नेतृत्व करणारे, सामाजिक कार्याची प्रचंड ओढ आणि अनुभवी चेहरा म्हणून ओळखल्या  जाणाऱ्या निगडी बुद्रुक येथील विकास लेंगरे यांना देण्याची मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांनी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्याकडे केली आहे.त्यांच्या कार्यकर्त्यांनी लेंगरे यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळवण्यासाठी जोर लावला असून तशी मागणी होत आहे.येत्या काही आठवड्यात उमदी जिल्हा परिषद गटासाठी पोटनिवडणुक लागणार आहे. आमदार विक्रमसिंह सांवत यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने  रिक्त जागेसाठी पोटनिवडणुक होत आहे. 

या पोटनिवडणुकीत अटीतटीचा सामना बघायला मिळणार आहे.तिन्ही पक्षाच्या इच्छुकांनी निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे. काँग्रेसकडून धनगर समाजातील युवा नेतृत्व विकास लेंगरे यांनीही निवडणुकीची तयारी केली असून त्यांनी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागितली आहे. लेंगरे यांना सामाजिक कार्याची आवड आहे. त्यांनी आतापर्यंत आपल्या समाजाबरोबरच इतर समाजातील सर्वसामान्य गरजू गरीब रुग्णांना उपचार मिळणेकामी शासनाच्या अनेक योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. मागासवर्गीय समाजातील भूमिहीनांना दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेअंतर्गत लाभ मिळवून दिले आहे.अनेकाना रेशनकार्ड व इतर आवश्यक दाखले काढून देण्याबरोबरच वसंत घरकुल, यशवंत, रमाई आवास योजनांतर्गत बेघर लोकांना घरकुल योजनेचा लाभ मिळवून दिला आहे.  त्यामुळे लेंगरे यांना मोठी सहानुभूती आणि पाठिंबा आहे. 
 


Blogger द्वारे प्रायोजित.