जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील एका वैद्यकीय व्यवसायिकाने परदेश दौऱ्यावरून आल्यानंतर आपला वैद्यकीय व्यवसाय सुरू केल्याच्या संशयावरून पोलीस व आरोग्य विभागाकडून त्यांचा दवाखाना सील करण्याची कारवाई केली.
अधिक माहिती अशी,पुर्व भागातील एक वैद्यकीय व्यवसायिक परदेशातून नुकतेच परतले आहेत.त्यांची विमानतळावर कोरोना तपासणी करण्यात आली आहे.त्यांच्या हातावर आरोग्य विभागाने होम क्कारंटाईनमध्ये विलगीकरणाचा शिक्का मारून घरी पाठविण्यात आले होते.त्यांचा पुर्व भागातील दवाखाना सुरू होता,अशा आरोपावरून उमदी पोलीस व आरोग्य विभागाने कारवाई केली आहे.