Header Ads

येळवी | तुकाराम महाराज यांच्याकडून जतेत 5 हजार मास्कचे वाटप |






 


येळवी,वार्ताहर : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जतच्या जनतेत जागृती व्हावी तसेच त्यांची सुरक्षा लक्षात घेत चिकलगी मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांनी जत तालुक्यात मोफत पाच हजार मास्क वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.येळवी ता.जत येथून मास्क वाटपचा शुभारंभ करण्यात आला.त्यानंतर तुकाराम महाराज यांनी प्रांताधिकारी, तहसिल,पोलीस ठाणे, पंचायत समिती कार्यालयातील अधिकारी,कर्मचाऱ्यांना मास्कचे वाटप केले.

जगभर कोरोनाची दहशत पसरली आहे. भारतासह इटली, चीन, अमेरिकासह अन्य देशात धुमाकूळ घातला आहे. महाराष्ट्रतही याची संख्या वाढत चालली आहे.या पार्श्वभूमीवर शासनाने संचारबंदी, लॉकडाऊन आदी महत्वाचे निर्णय घेत ते राबवत आहेत.कोरोनाची दहशत सर्वत्र वाढत चाललेली असताना जतकरांच्या मदतीसाठी पुन्हा एकदा चिकलगी मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज धावून आले आहेत.जत तालुक्यात गाव पातळीवर काम करणाऱ्या शासकीय अधिकारी,कर्मचारीसह जतच्या वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी यांना मास्क वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. शासकीय कार्यलये व गावपातळीवर जावून मानव मित्र संघटनेच्या माध्यमातून मास्कचे वाटप करण्यात येणार आहे. सोमवारी तुकाराम बाबा महाराज यांनी तालुक्यातील येळवी येथे मास्कचे वाटप केले. यावेळी येळवीचे सरपंच विजयकुमार पोरे, उपसरपंच सुनील अंकलगी, ग्रामपंचायत सदस्य संतोष पाटील, सचिन माने, शशिकांत महाराज गानमोटे, दीपक अंकलगी, अविनाश पोरे, सुभाष चव्हाण, नंदकुमार खंडागळे, निलप्पा स्वामी,  तुकाराम सुतार, नवनाथ पवार, नितीन पोतदार, सुनील वाघमारे, सागर कोळी आदी उपस्थित होते.तुकाराम महाराज यांनी मास्क सरपंच यांच्याकडे सुपूर्त करत शासकीय अधिकारी, कर्मचारी व लोकप्रतिनिधी यांना मास्क द्यावे असे आवाहन केले. त्यानंतर तहसिलदार सचिन पाटील तहसील, पंचायत समिती, प्रांताधिकारी कार्यालयात जाऊन त्यांना मास्कचे वाटप केले. रस्त्यावर आपली डयुटी निभावत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनाही त्यांनी मास्क दिले.

तुकाराम बाबा महाराज म्हणाले, कोरोनाचे रूप महाभयंकर होण्याचे अगोदर आपण दक्षता घेतली तर हा रोग आपल्या जवळ येवू शकत नाही. शासन, प्रशासनाने जो लढा सुरु केला आहे त्याला बळ देणे आपले काम आहे. जगात आरोग्य सेवेत दोन नंबरवर असलेल्या इटलीमध्ये दररोज हजारो जण मरत आहेत ही बाब लक्षात घ्यावी व दक्ष रहावे असे आवाहन केले.

 

 

जतचे तहसीलदार सचिन पाटील यांना मास्क देताना तुकाराम बाबा महाराज


 

 




 

 

 


 



 



Blogger द्वारे प्रायोजित.