Header Ads

जतेत दुसऱ्या दिवशी रस्ते निर्मनुष्य | कडकडीत बंद | जमावबंदीनंतर लोक रस्त्यावर | किरकोळ लाठीचार्ज


 


 

 

जत,प्रतिनिधी : झपाट्याने वाढत असलेल्या कोरोनो विषाणूच्या पार्श्वभूमीवर जत शहरासह तालुक्यात दुसऱ्या दिवशी देखील उस्फुर्त बंद पाळण्यात आला.किराणा दुकाने,मेडिकल,भाजीपाला विक्रेत्यांना काळ मुभा देण्यात आली होती. मात्र अन्य दुकाने पुर्णत:बंद होती.कायम गजबलेले शहरातील रस्ते,चौक दुसऱ्या दिवशीही सुनसान निर्मनुष्य होते.जमावबंदी आदेश असतानाही काही चौकात जवान करून उभे असलेल्या लोकांवर पोलिसांनी किरकोळ लाठीचार्ज केला. जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी यांनी जिल्ह्यात 31 मार्चपर्यत 144 कलम लागू केले आहे. याचे कुणीही उल्लंघन करू नये असे आवाहन तालुका प्रशासनाने केले आहे.जत शहरात रविवारच्या जनता संचार बंदीला नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे.आता पुढे 31 मार्च पर्यंत अशीच साथ देण्यात यावी असे आवाहन करण्यात आले आहे.जतेत कुणी नियमांचे पालन करत नसेल तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली. चार पेक्षा अधिक लोकांनी फिरू नये,अत्यावश्यक सेवा व गरज असेल तरच नागरिकांनी बाहेर पडावे असेही सूचित करण्यात आले आहे. तर, बाहेरून येणाऱ्या वाहनांची कसून चौकशी केली जात आहे.

एरव्ही सकाळी गजबजणारी बाजारपेठ आणि सर्वच मुख्य रस्त्यांसह लहान रस्त्यांवर देखील एकही मनुष्य दिसत नसल्याने कोरोनामुळे जतेत दुसऱ्या दिवशी जनता कर्फ्यूची परिस्थिती होती.रविवारी,सोमवारी सकाळी वृत्तपत्र विक्रेत्यांनी भल्या पहाटे लोकांना वर्तमानपत्रे वितरित केली. तसेच दूध विक्री करणारे विक्रेते यांनी शनिवारी रात्री सोमवार सकाळी लवकर दूध वितरित केले.जत बसस्थानकावर देखील शुकशुकाट होता.त्याशिवाय तालुक्यात कायम गजबलेली डफळापूर, बिंळूर,शेगाव,माडग्याळ, संख,उमदीत दुसऱ्यादिवशी कडकडीत बंद पाळण्यात आला.त्याशिवाय ग्रामीण भागातील गावेही बंद होती.

 


 

Blogger द्वारे प्रायोजित.