Header Ads

जिल्हा परिषद केंद्र शाळा सनमडीचा लोकार्पण सोहळा संपन्न


 

माडग्याळ,वार्ताहर : जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा सनमडी ता.जत येथे आज रोजी शाळेला सढळ हाताने मदत करणाऱ्या गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच विविध सामाजिक संस्थांचा जि.प. शाळा सनमडीमार्फत आभार लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

 


 

या कार्यक्रमासाठी प्रमुख जिल्हा परिषदेचे अध्यक्षा सौ.प्राजक्ता कोरे ह्या उपस्थित होत्या,तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार विलासराव जगताप,जिल्हा परिषदेच्या सभापती सुनीता पवार,पंचायत समिती सभापती, मनोज जगताप,जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील,तम्मणगौडा रवि पाटील,उपसभापती-विष्णू चव्हाण, सरपंच रुक्मिणी पवार,एस.एम. सी.अध्यक्ष तमन्ना कर्ले आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी शाळेला सढळ हाताने मदत करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा आभारपत्र,सन्मानचिन्ह,पुष्पहार मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.शाळेला आधार फौंडेशन सनमडीमार्फत शाळेत बोलक्या भिंती रंगवून देण्यात आल्या आहेत.पाणी फौंडेशन सनमडी मार्फत कंपाऊंड भिंती रंगकाम केले आहे.तंटामुक्ती अध्यक्ष सनमडी मार्फत शालेय विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स कीटचे वाटप करण्यात आले.ग्रामपंचायत सनमडी मार्फत सर्व वर्गांना स्मार्ट टी.वी.देऊन शाळा डिजिटल केल्याबद्दल सर्वांचा सत्कार सोहळा संपन्न झाला.

यावेळी बोलक्या भिंती व डिजिटल वर्गाचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष प्राजक्ता कोरे यांच्याहस्ते झाले. 

 

जिल्हा परीषद शाळा सनमडीच्या विविध उपक्रमाचे उद्घाटन करताना माजी आमदार विलासराव जगताप,जि.प.अध्यक्षा प्राजक्ता कोरे,सभापती सुनिता पवार,तम्मणगौडा रवीपाटील,मनोज जगताप,सरदार पाटील

Blogger द्वारे प्रायोजित.