Header Ads

सनमडीत | महाआरोग्य शिबिरात 642 रुग्णांनी घेतला लाभ

 

जत,प्रतिनिधी : जिल्हा परिषद सांगली,जत पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने व स्वर्गीय नारायणराव सुबराव जगताप यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मोफत आरोग्य महाशिबीर संपन्न झाले.

जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेच्या आवारात झालेल्या या शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला.यामध्ये 642 रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले.

 


 

शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.प्राजक्ता कोरे, माजी आमदार विलासराव जगताप,समाजकल्याण सभापती सुनीता पवार यांच्याहस्ते झाले.यावेळी सभापती मनोज जगताप,उपसभापती विष्णू चव्हाण,जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील,तम्मणगौडा रवी पाटील,भाजपचे तालुकाध्यक्ष सुनील पवार,रासपचे अजित पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले.या शिबिरात प्रधानमंत्री राष्ट्रीय स्वास्थ सुरक्षा अभियान,बालरोग नाक-कान-घसा दंतरोग ह्रदयरोग,एच.आय.व्ही.

त्वचारोग, मधुमेह, अस्थिरोग, वैद्यकशास्ञ प्रजनन आदी आजारा विषयक तपासणी व उपचार तज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आले.याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचे सत्कार करण्यात आले.यावेळी जत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय बंडगर,डॉ.भारती पाटील यांच्यासह सर्व आरोग्य अधिकारी,कर्मचारी,आशा वर्कर्स उपस्थित होते.

 

 

सनमडी ता.जत येथील आरोग्य शिबिराचे उद्घाटन करताना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे,माजी आमदार विलासराव जगताप,सभापती सुनीता पवार,तम्मणगौडा रवीपाटील,सरदार पाटील


 

  

Blogger द्वारे प्रायोजित.