Header Ads

जत | कोरोना ; जत तालुका ढवळा


 जत : करोना इफ्केट 

धानम्मा मंदिर बंद ; 8 यात्रा रद्द,बाजार मोठा परिणाम

जत,प्रतिनिधी : राज्यभरात फैलाव झालेल्या करोना विष्णाणूचा वाढलेला प्रभावामुळे जत तालुक्यात तणावाचे वातावरण आहे.नागरिकांत उलट-सुलट चर्चाचे लोन सुरू आहे.तालुका प्रशासनाने कडक पाऊले उचलली आहेत.यामुळे तालुक्यातील आठ सुप्रसिद्ध देवस्थानच्या यात्रा रद्द करण्यात आल्या आहेत.सुप्रसिद्ध गुड्डापूर येथील दानम्मा देवीचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी इतिहासात प्रथमच बंद करण्यात आले आहे. बाजारपेठ शासकीय कार्यालये या ठिकाणची गर्दी ओसरली आहे.जगभरात दहशत निर्माण केलेल्या करोनोची जत तालुक्यातील दहशत कायम आहे.परदेशातून आलेल्या नागरिकांपैंकी एकालाही कोरोनाची बाधा झाली नसल्याचे तपासणीत स्पष्ट झाले आहे.तरीही त्यांची नागरिकांत जोरदार चर्चा आहे.विशेषत:ग्रामीण भागात चर्चेला उधान आले आहे.

उन्हाळ्याच्या हंगामात,व पाडव्याच्या मुर्तूहावर जत तालुक्यातील अनेक सुप्रसिद्ध देवस्थानच्या यात्रा भरविल्या जातात.त्या यात्रांना कोरोनाचा फटका बसला आहे.उमदी येथील श्री.मलकारसिध्द, वळसंग येथील केंचराया,खलाटी येथील श्री.लक्ष्मी देवी,बाज येथील साकली सुलतान पीराचा ऊरूस,जत येथील राजेबागश्वार पिराचा ऊरूस,डफळापूरची एकवीरा देवी,जत शिवाजी पेठेतील मायाक्कादेवी यात्रा,जत येथील स्वामी समर्थ प्रकटदिन सोहळा यासह अनेक गावच्या यात्रावर करोनोमुळे रद्द करण्यात आल्या आहेत.पोलीस व प्रशासनाने यात्रा कमिट्यांना सक्त सुचना दिल्या आहेत.जत तालुक्यातील गुड्डापूर येथे लिंगायत धर्माचे सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे.या ठिकाणीचे श्री दानम्मादेवीचे मंदिर इतिहासात प्रथमच दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे.भक्तासाठी असणारे भक्तनिवास बंद करण्यात आले आहे.जत बाजार पेठेवर करोनोचा स्पष्टपणे परिणाम दिसून आला आहे. बाजार पेठेतील गर्दी रोडावली आहे.व्यापारवरही त्यांचा परिणाम दिसून आला आहे. तहसील कार्यालय,पंचायत समिती,प्रातांधिकारी यासह अनेक शासकीय कार्यालयातील पक्षकारांची गर्दी कमी झाली आहे.

 


Blogger द्वारे प्रायोजित.