Header Ads

गिरगावात बेकायदा देशी दारू पकडली

गिरगावात बेकायदा देशी दारू पकडली

 

जत,प्रतिनिधी : गिरगाव ता.जत येथे कोडिक्स दुकानात बेकायदा दारू विकणाऱ्या लक्ष्मण रविंद्र इंगळे यांच्या अड्ड्यावर छापा टाकत 27हजार 480 रूपयाच्या 478 बॉटल जप्त केल्या.उमदी पोलीसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.


पोलीसांनी पोलीसांनी दिल्ली माहिती अशी,गिरगाव येथील डवरी समाज मंदिरासमोरील कोडिक्स दुकानात बेकायदा दारू विकत असल्याची माहिती उमदी पोलीसांना खबऱ्याकडून मिळाली होती.त्या आधारे छापा टाकला असता कोडिक्स दुकानात 248 देशी व टँगो पंच कंपनीच्या 230 अशा 478 बॉटल जप्त करण्यात आल्या.याप्रकरणी माल देणारा नागाप्पा उर्फ अप्पू मदगोंडा पुजारी रा.संख यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे.उपनिरिक्षक नामदेव दांडगे,पोलिस हवलदार श्रीशैल वळसंग,सचिन आटपाडकर,संभाजी कांरडे यांच्या पथकाने कारवाई केली.अधिक तपास आटपाडकर करत आहे.

Blogger द्वारे प्रायोजित.