Header Ads

जत | गोब्बी ट्रॅक्टर्सचा "मेगा सर्व्हिस कँम्प" सुरू


 




गोब्बी ट्रॅक्टर्सचा "मेगा सर्व्हिस कँम्प" सुरू

 

जत,प्रतिनिधी : जत येथील गोब्बी ट्रॅक्टर्स या फर्मच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त भव्य मेगा सर्व्हिस कँम्पचे ता.3 मार्च रोजी जेष्ठ अर्थतज्ञ चंद्रशेखर गोब्बी व फोर्स कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.हा कँम्प 5 मार्च अखेर सुरू राहणार आहे.यात फोर्स कंपनीच्या सर्व मॉडेलच्या टँक्टर्सच चेकअपचे केले जाणार आहे. याशिवाय या मेगा सर्व्हिस कँम्पमध्ये टँक्टर घेऊन येणाऱ्या ग्राहकास हमखास बक्षिस जिंकण्याची सुवर्णसंधी उपलब्धं केली आहे.जत शहरातील नामांकित गोब्बी कुंटूबियांचे पाच वर्षापुर्वी फोर्स टँक्टर एंजन्सी क्षेत्रात पर्दापण केले आहे.गेल्या दोन वर्षात दोन हजारा हुन जादा ग्राहकांच्या विश्वासास पात्र झालेले गोब्बी टँक्टर फर्मने विक्री,विक्री पश्चात अत्याधुनिक व अापुलकीची सेवा देण्यात नावलौकिक मिळविला आहे.जत तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना वरदान ठरणारे फोर्स कंपनीचे टँक्टर्स जतसारख्या ग्रामीण भागात भव्य शोरूम काढून गोब्बी यांनी उपलब्धं करून दिली आहेत.त्यात फोर्स कंपनीचे सर्व मॉडेल्स येथे विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत.त्याशिवाय टँक्टर्सचे तपासणी कंपनीच्या प्रशिक्षीत अंभियत्याकडून दिली जाते.बोरोस्ते अग्रो नाशिक कंपनीचे औषधे फवारणीचे सर्व यंत्रे येथे उपलब्धं आहेत. राहित स्टिल पुणे यांच्या कंपनीची पेरणी यंत्रे,साई अग्रो हुबळीचे नांगर व रोटावेअर सह शेती उपयोगी सर्व साहित्य येथे उपलब्धं करण्यात आले आहे. प्रगतीच्या शेतीसाठी लागणारी यंत्रे येथे विक्री साठी उपलब्धं आहेत. या मेगा सर्व्हिस कँम्पमध्ये त्यांचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात येणार आहे.तसेच कँम्पमध्ये बुकींग करणाऱ्यां शेतकऱ्यांना हमखास भेटवस्तू मिळणार आहे. जत सह संख, सांगोला,कवटेमहाकांळ व सिमावर्ती कर्नाटकातील भागातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन संचालक सुभाष गोब्बी यांनी केले आहे.


अरविंद कुमार,संजय पात्रीकर,नविन कुमार सिंग,नितिन मांडके,रोहित चौधरी,शेखर गाडवे,जितेंद्र सोनवणे,अनिलकुमार लडवाल,निलेश योगे,सुधांशु गोहदकर,विशाल चव्हाण आदी फोर्स कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.जत येथील शेगांव रोड,संतोष पेट्रोल पंपासमोर,हा मेगा सर्व्हिस कँप सुरू आहे.

 

 


जत येथील गोब्बी टँक्टर्सचे उद्घाटन करताना जेष्ठ अर्थ तज्ञ चंद्रशेखर गोब्बी,सुभाष गोब्बी,फोर्स कंपनीचे अरविंद कुमार,संजय पात्रीकर आदी

 

 

 

 




 


Blogger द्वारे प्रायोजित.