Header Ads

जत | अभिमन्यु मासाळ यांची जीवन गौरव पुरस्कारांसाठी निवड

जत,प्रतिनिधी : जय गंगातारा सांस्कृतिक कलाकार संघटना (महाराष्ट्र राज्य)यांच्या वतीने देण्यात येणारा जीवन गौरव पुरस्कारांसाठी जलसंपदा विभागाचे शाखा अभिंयते अभिमन्यू कामाण्णा मासाळ यांची निवड करण्यात आली.नुकतेच त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.

 


 

प्रशासकीय सेवा बजावत असताना,सामाजिक भाग ठेवून कार्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात येतो.जतचे जलसंपदा विभागाचे शाखा अभिंयते मासाळ यांच्यावर जलसंपदाच्या म्हैसाळ योजनेच्या विविध कामाची जबाबदारी आहे.त्यातून त्यांनी प्रशासन,शेतकरी असा समन्वय साधत ते सामाजिक हित जपत वैशिष्ट्यपुर्ण काम करत लोकहिताला प्राधान्य देत शासकीय सेवा बजावत आहेत.त्यांच्या या कामाची दखल घेत त्यांची निवड करण्यात आली आहे.

 

 

 


जत : अभिमन्यु मासाळ यांची जीवन गौरव पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दलचे पत्र देण्यात आले.
Blogger द्वारे प्रायोजित.