जत | मागणी येताच,टँकरचे प्रस्ताव तातडीने सादर करा | प्रांताधिकारी प्रंशात आवटे

 
 

मागणी येताच,टँकरचे प्रस्ताव तातडीने सादर करा : प्रांताधिकारी

 

जत,प्रतिनिधी : भविष्यातील पाणी टंचाईच्या काळात सर्व विभागाने सतर्क रहावे,टँकर मागणीचे प्रस्ताव आल्यास दोन दिवसात प्रस्ताव सादर करा,असे आदेश प्रांताधिकारी प्रंशात आवटे यांनी दिले.त्यांनी जत तहसील कार्यालयात भविष्यातील टंचाईबाबत आढावा बैठक घेतली.यावेळी तहसीलदार सचिन पाटील, बिडिओ अरविंद धरणगुत्तीकर,लघु पांटबधारे,पाणी पुरवठा,जलसंधारण,म्हैसाळ योजनेचे अधिकारी उपस्थित होते.
म्हैसाळ सिंचन योजनेचे आवर्तन सुरू कराव्या अशा सुचना अधिकाऱ्यांना आवटे यांनी दिल्या,मात्र त्यासाठी ग्रामंपचायतीचे ठराव गरजेचे असल्याचे म्हैसाळ योजनेच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याने ग्रामपंचायतीने ठराव द्यावेत,पाणी टंचाई असणाऱ्या गावात तातडीने पाहणी करून टँकरचे प्रस्ताव सादर करावेत.ज्या गावात उपसा बंदीची आवश्यकता आहे.त्याचेही प्रस्ताव सादर करावेत.भविष्यातील टंचाईच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही विभागाने दिरगाई करू नये,अशा सुचना प्रांताधिकारी आवटे यांनी दिले.