Header Ads

संखमध्ये आठवडा बाजार भरविण्याचा प्रयत्न पोलीसांनी रोकला 


 

संख,वार्ताहर : संख ता.जत येथे जमावबंदी असतानाही ग्रामपंचायतीने बाजार बंद ठेवण्याचे आदेश देऊनही आठवडा बाजार भरविण़्याचा प्रयत्न काही व्यापारी,शेतकऱ्यांनी केला.उमदी पोलीसांनी संखमध्ये पोहचत बाजार बंद करायला लावला.


देशभरात कोरोना विषाणूचा प्रभाव वाढला आहे.सर्वत्र दक्षता घेतली जात आहे. त्याशिवाय राज्यभरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत.तरीही संखमध्ये ग्रामपंचायतीने बंदी आदेश दिलेले असतानाही आज सोमवार असणारा आठवडा बाजार भरविण्याचा प्रयत्न झाला.पोलीसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला.राज्यभरातून कोरोनाचा प्रभाव असलेले अनेक नागरिक तालुक्यात आले आहेत.त्यात काही कोरोनाचे रुग्ण असण्याची शक्यताही नाकारता येत नाही.त्यामुळे तालुक्यातील सर्व आठवडे बाजार,मंदिरे,दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.संख बाजारात मांडलेले साहित्य पोलीसांनी काढायला लावले.दरम्यान जिवनावश्यक असलेल्या पालेभाज्या,फळे विक्री होणे गरजेचे आहे.पोलीसांनी भाजीपाला विक्रेत्यांना काही वेळ विक्रीसाठी मुभा देण्याची गरज आहे.

 

जमावबंदी करू नका

 

सध्या जिल्ह्यातही कोरोनाचा प्रभाव वाढू लागला आहे.आपल्या भागात काही राज्यातील लोक आले आहेत.त्यांच्या तपासण्या आरोग्य विभाग करत आहे.जनतेला सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई करण्यात येईल.

 

दत्तात्रय कोळेकर

सा.पोलीस निरिक्षक,उमदी

 

 

संख येथे आठवडे बाजारात बसलेल्या विक्रेत्यांनी पोलीसांनी उठविले.


 

   
 Blogger द्वारे प्रायोजित.