वळसंग,वार्ताहर : वळसंग ता.जत येथील सिद्धू वाघमोडे (वय-45) यांना अज्ञात चारचाकी वाहनाने धडक दिल्याने गंभीर जखमी झाले.याबाबत पोलीसात अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.
सिध्दू वाघमोडे हे दुचाकीवरून शेड्याळकडे निघाले होते.समोरून आलेल्या एका चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीस धडक दिली.त्याते डांबरी रस्त्यावर आदळल्याने गंभीर जखमी झाले.त्यांना तातडीने जत येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृत्ती स्थीर आहे.