Header Ads

संख परिसरात बुरट्या चोरांचा धुमाकूळ  

संख,वार्ताहर : संख ता.जत येथे गेल्या काही दिवसापासून शेती साहित्य,जनावरे चोरांनी धुमाकूळ घातला आहे.त्यामुळे परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहेत.गेल्या चार दिवसापुर्वी सलग छोटी जनावरे पळवून नेहण्याचे प्रकार घडले आहेत.मध्यरात्री एक महिला व पुरूष संशास्पद फिरत असल्याचे काही नागरिकांना आढळून आले आहे.त्यांचा काही नागरिकांनी पाटलागही केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे.पोलीसांनी या भागात गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे.

 

 

संख परिसरात मटका,जूगार बळावले

 

संख,वार्ताहर : संख ता.जत परिसरात कल्याण,मुंबई मटका,जूगार जोमात सुरू आहे.यामुळे तरूणाई वाम मार्गाला लागत असल्याने याकडे पोलीसांनी गांर्भिर्याने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.संख परिसरातील अनेक गावात असे अवैध धंदे फैलावले आहेत.त्यामुळे अनेक शेतमजूर,सुशिक्षित बेरोजगार या अवैध धंद्याच्या आहारी जात आहेत.स्थानिक पोलीसाचेही याकडे दुर्लक्ष होत असल्याचे आरोप होत आहेत.उमदी ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षकांनी लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.
 

 


 


  Blogger द्वारे प्रायोजित.