Header Ads

उमदी | मी नालायक आहे,समाजाचा दुष्मन आहे | उमदी पोलीसांचा बंदी आदेश मोडणाऱ्यांना दणका | पाट्यासह फोटो सोशल मिडियावर


जत,प्रतिनिधी : राज्यभर कोरोनाचा प्रभाव वाढत आहेत.जिल्ह्यासह जत तालुक्यात संचार बंदी घोषित केली आहे. तरीही नागरिक ऐकत नसल्याने उमदी पोलीसांनी नवी शक्कल लढविली आहे.संचार बंदी असतानाही बिनकामी फिरणाऱ्या नागरिकांचे "मी नालायक आहे,मी घरी थांबणार नाही,"मी समाजाचा दुश्मन आहे,मी घरी थांबणार नाही." अशा पाट्या धरून फोटो काढत सोशल मिडियावर टाकण्यास सुरूवात केली आहे.अनेकवेळा सांगूनही नागरिक ऐकत नाहीत.त्यामुळे वैतागलेल्या पोलीसांनी नवी मोहिम उघडली आहे. उमदी परिसरात राज्यातून अनेक नवे लोक आले आहेत.त्यात जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव झपाट्याने वाढत आहे.पोलीस,आरोग्य यंत्रणा आवाहन करूनही काही मुर्दाड लोक पुन्ह,पुन्हा रस्त्यावरून फिरत आहेत.त्यामुळे वैतागलैल्या पोलीसांनी नामी शक्कल शोधत बंदी आदेश झुगारून फिरणाऱ्या नागरिकांच्या अब्रुचे खोबरे केले आहे. उमदी पोलीसांनी लढविलेल्या या नव्या प्रयोगामुळे पोलीस ठाणे हद्दीतील रस्त्यावरून फिरणाऱ्या लोंकाची गर्दी बंद झाली आहे.या मोहिमेचे राज्यभर स्वागत करण्यात येत आहे.

 

 

 नाईलाजा वास्तव अशी मोहिम 

 

बंदी आहे,गंभीर परिस्थिती आहे,बाहेर फिरू नका असे वारवांर सांगूनही नागरिक ऐकत नव्हते.त्यामुळे अशा प्रकारे मोहिम उघडावी लागली आहे.याशिवाय कायदेशीर कारवाईही केली जाणार आहे.

 

दत्तात्रय कोळेकर 

सा.पो नि.उमदी
 


 

Blogger द्वारे प्रायोजित.