जत | कोरडा नदीवर पाच चेकडैम बांधणार |सांगोल्याकडे वाहून जाणारे 83.37 घ.मी.पाणी तालुक्यात अडविण्यात येणार
 

जत,प्रतिनिधी : जतचे पाणी कोरडा नदी पात्रातून सांगोल्याकडे वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी तालुक्यातील वाळेखिंडी,शिंगणहळ्ळी, बागलवाडी, लोणारवाडी या भागात सव्वा चार कोटी रुपये खर्चुन'पाच चेकडैम उभारण्यात येणार आहेत.हे चेकडैम उभारण्यात आल्यानंतर पावसाचे वाहून जाणारे पाणी अडणार असून 83.37 स.घ.मी. पाणीसाठा होणार आहे. या चेकडॅममुळे पावसाचे पाणी

अडविण्यात येणार आहे.त्याचबरोबर 50 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. या कामाचे 'भूमिपूजन जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी अजिंक्यतारा विद्या प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर जाधव, लक्ष्मण बोराडे यांच्यासह या भागातील सरपंच, ग्रामस्थ 'मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी बोलताना जगताप म्हणाले की,'शेगावसह तालुक्यात आपल्या आमदार कालावधीत सिंचन, जलसंधारण या कामांना प्राधान्य दिले. शेगाव जिल्हा परिषद गटात जि.प. सदस्या स्नेहलता जाधव यांना ज्याअपेक्षेने संधी दिली त्या संधीचे त्यांनी सोने केले व त्यास प्रभाकर जाधव यांची समर्थ साथ मिळाली. 

दरम्यान सदस्या स्नेहलता जाधव यांनी शेगाव जिल्हा परिषद गटात भरीव निधी खेचून आणला आहे. शेगाव गटातून वाहणाऱ्या एकमेव कोरडा नदीपात्राचे वाहून

जाणारे पाणी थांबले,जिरले पाहिजे व अधिकाधिक क्षेत्र सिंचनाखाली आले पाहिजे यासाठी त्यांचा सतत पाठपुरावा सुरू असतो. जिल्हा नियोजनच्या सदस्या असलेल्या स्नेहलता जाधव यांनी जिल्हा नियोजनमधून तसेच राज्य शासनाकडून भरीव निधी खेचून आणला आहे. प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात भरीव कामे शेगाव जिल्हा परिषद गटात झाली आहेत. तीन वर्षात कोरडा नदी पात्रावर सात चेकडैम उभारण्यात येणार आहेत. यापूर्वी सव्वा कोटींचे दोन चेकडैम उभारण्यात आले आहेत, तर आता सव्वा चार कोटी खचून वाळेखिंडी धरणाजवळ एक, कोरडा नाला व बागलवाडी नाल्याच्या वरील बाजूस व खालील बाजूस प्रत्येको एक, शिंगणहळ्ळी व लोणारवाडी येथे प्रत्येकी एक असे पाच चेकडॅम उभारण्यात येणार आहेत.100 मीटर लांब व अडीच मीटर उंचीचे हे डॅम राहणार आहेत, असे प्रभाकर जाधव यांनी सांगितले.

 


शेगाव गट सुजलाम सुफलाम करणार-स्नेहलता जाधव

शेगाव जिल्हा परिषद गटात शिक्षण,आरोग्य, सिंचन, जलसंधारण कामांना तीन वर्षांत प्राधान्य दिले. उवरित दोन वर्षात ही विकासकामे करणे व शेगाव गटाचा चेहरामोहरा बदलणं हाच ध्यास आमचा आहे. शेगाव गट सुजलाम सुफलाम करणे हेच ध्येय असल्याचे जि.प. सदस्या स्नेहलता जाधव यांनी यावेळी बोलताना सांगितले आणि विलासराव जगताप,प्रभाकर जाधव यांच्या सहकार्याबद्दल आभार मानले.

 

 

कोरडा नदीवरील चैकडँमचे उद्घाटन करताना माजी आमदार विलासराव जगताप,जि.प.सदस्या स्नेहलता जाधव,अँड.प्रभाकर जाधव