Header Ads

कोरोना : शेतकरी धोक्यात आहे : द्राक्ष,शेतमालाची वाहने आडवू नका ; महेश खराडे






सांगली,प्रतिनिधी : महापूर,अतिवृष्टीतून बचावले ते कोरोनात अडकले अशी विचित्र परिस्थिती जिल्ह्यातील शेतकऱ्याची झाली आहे.सध्या जिल्ह्यात द्राक्ष हंगाम सुरू आहे द्राक्ष वाहतूक करणाऱ्या वाहनांची अडवणूक करू नये अशी मागणी जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केली आहे.

खराडे म्हणाले,द्राक्ष उत्पादक व भाजी पाला उत्पादक शेतकऱ्याची विचित्र अवस्था झाली.अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे 50 टक्के द्राक्ष बागाचे नुकसान झाले आहे.महापुराच्या काळात वाळवा,पलूस,व मिरज तालुक्यातील द्राक्ष शेती उध्वस्त झाली,तर अतिवृष्टी मुळे तासगाव कवठेमहांकाळ व मिरज पूर्व भागातील द्राक्ष शेती संकटात सापडली. या दोन्ही संकटातून जी द्राक्ष शेती वाचली होती ती आता कोरोनाच्या संकटात सापडली आहे.द्राक्ष मालाला उठाव नाही,द्राक्ष कवडीमोल किमतीने विकावी लागतं आहेत.त्यामुळे या काळात द्राक्ष वाहतूक अडवू नये काही जण बेदाणा करण्यासाठी सांगोला तालुक्यातील जूनोणी परिसरातील शेडवर द्राक्ष नेत आहेत.तर काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कर्नाटक व सोलापूर परिसरात द्राक्ष शेती केली आहे.त्यांना जिल्हा पोलीस प्रशासनाने सहकार्य करावे, ही द्राक्षे बेदाणा किंवा प्रेकूलींग युनिट मध्ये ठेवण्यासाठी शेतकरी घेवून जात आहेत तरी या सर्व बाबीचा प्रशासनाने विचार करून सहकार्य करावे. अगोदरच मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांच्या पेकटात लाथ मारू नये अशी अपेक्षा आहे.

 

चिकन मुळे कारोना होत नाही चिकन खा

 

चिकन खाण्यामुळे कोरोना होतो,असा गैर समज काहींनी सोशल मीडियावर पसरविण्यात आला होता.त्यामुळे मोठ्या प्रमाणात पोल्ट्री व्यवसाय धोक्यात आला कोंबड्या फुकट वाटण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे.त्यांना मदतीची गरज आहे चिकन मध्ये रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्याची झमता आहे.त्यामुळे चिकन खा तंद दुरुस्त रहा असे आवाहन खराडे यांनी केले आहे.

 

सनी टायझर, मास्क चा काळा बाजार

कारोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मास्क व सनी टायझरची विक्री वाढली आहे.मात्र काही उत्पादक कंपनी याचा गैर फायदा घेत आहेत.अवाच्या सव्वा दराने त्याची विक्री करत आहेत. त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी खराडे यांनी केली आहे.




 


 

Blogger द्वारे प्रायोजित.