Header Ads

कोरोना : जत नगरपरिषदेकडून नागरिकांना नव्या सुचना | कोरोनाला हद्दपार करण्याच्या मोहिमेत सहकार्य करा ; मुख्याधिकारीजत,प्रतिनिधी : झपाट्याने फैलाव होणाऱ्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जत नगरपरिषदेकडून नागरिकांच्या हितासाठी सातत्याने उपाय योजना करण्यात येत आहेत.आज ता.26 रोजी नगरपरिषदेकडून नागरिकांनी पाळावयाच्या खालील उपाययोजना सुचविल्या आहेत.त्याचे काटेकोर पालन करावे असे आवाहन, मुख्याधिकारी अभिजीत हराळे यांनी केले आहे.
 • 1.शहरात कोरोना विषाणू रोकण्यासाठी सतत सॅनिटायझरचा वापर करावा, मास्क
  किंवा रुमाल तोंडाला बांधवा,सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये.आपले हात वारंवार साबणाने स्वच्छ धुवावेत.हस्तस्पर्श टाळवा,सार्वजनिक ठिकाणी वस्तूंचा संपर्क टाळावा.हस्तांदोलन करण्याऐवजी भारतीय नमस्कार करण्यास प्राधान्य द्यावे. संवाद
  साधताना किमान 1 मीटर अंतर ठेवावे. इत्यादी उपाययोजना व सुचना देण्यात आलेल्या आहेत.

 • 2. तसेच जत नगरपरिषदेतर्फे संपूर्ण शहारत सोडियम हायपोक्लोराईट (विषाणू प्रतिबंधक) या केमिकलचा वापर करुन संपूर्ण शहरात फवारणी केली जात आहे.
  सार्वजनिक ठिकाणे (उदा. बस स्टॅन्ड, मुख्य बाजार पेठ,सरकारी कार्यालये) येथे निरजंतुकीकरण फवारणी केली आहे.


 • 3.सध्या महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या रुग्णाचा वाढीव आकडा लक्षात घेता स्व:ताला किंबहुना आपल्या कुंटुबाना जपावे. संपूर्ण जगभरात भितीचे वातावरण पसरले आहे. दिनांक 23 मार्च 2020 पासून संपूर्ण महाराष्ट्रात संचार बंदी लागू झाली असल्याने अत्यावश्यक सेवेची गरज असल्याशिवाय
  घराबाहेर पाडू नका, याकरिता 1 रिक्षा व 9 घंटागाडीद्वारे दवंडी देणेचे काम सुरु आहे.

 • 4.तसेच शहरातील किराणा माल व्यवसायीकांनी सकाळी 10 ते 2 व सायंकाळी 6 ते 8 व डेअरी व्यवसायीकांनी सकाळी 7 ते 9 व सायंकाळी 6 ते 8 पर्यंत संकलन करणेचे आहे. कोणत्याही परिस्थितीत दुध डेअरीमध्ये दुध विक्री करणेचे नाही.दुध घरोघरी जाऊन विक्री करणेचे आहे.या वेळेतच ग्राहकांना घरपोच सेवा पुरविणेचे आहे. तसेच नगरपरिषदे मार्फत देणेत आलेली किराणा दुकानाची व डेअरी व्यवसायीकांची यादी सोबत दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून घरपोच सेवा उपलब्ध करुन घ्याव्यात
  अशा सुचना देण्यात आलेल्या आहे.

 • 5. भाजी विक्रेते यांनी घरोघरी जाऊन भाजी विक्री करण्यासंबंधी नगरपरिषदेने भाजी विक्रेत्यांना आदेशित केले आहे.तरी त्यांना नेमुद दिलेली वेळ सकाळी 8 ते 12 या वेळेतच आपण घरोघरी जाऊन भाजी विक्री करणेचे सुचित केले आहे.

 • 6.सध्या महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या रुग्णाचा  आकडा लक्षात घेता सध्या संपूर्ण जगभरात भितीचे वातावरण पसरले आहे.त्यामुळे परगावाहून येणाऱ्या नागरीकांची माहिती नगरपरिषद कार्यालयामध्ये 9923172137व 8446630633 या मोबाईलनंबरवर द्यावी.

 • तसेच परगावाहून आलेली संबंधीत व्यक्ती स्वत:ला स्वत:च्या घराताच 14 दिवसांसाठी विलगीकरण करुन घ्यावे व घरातील व्यक्तींशी व इतर

 • व्यक्तीशी संपर्क टाळावा. तसेच संबंधीत व्यक्ती घराबाहेर फिरत असल्याचे निदर्शनास आल्यास योग्य ती कायदेशीर कारवाई करणेत येईल याची नोंद घ्यावी.


 


Blogger द्वारे प्रायोजित.