Header Ads

जत | महिला बचत गटाच्या फिरता निधी वाटपावेळी गोधळ जत नगरपरिषद  :


 






जत,प्रतिनिधी : नगरपरिषदेचा बचत गटाचा फिरता निधी अखेर महिला दिनी नगराध्यक्षा यांनी वाटप केला.त्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.दरम्यान या कार्यक्रमात काही नगरसेवक अचानक आल्याने गोंधळ झाला.त्यामुळे बचत  गटाच्या पदाधिकारी महिलांनी निधीचे चेक परत दिले.







केंद्र व राज्य शासनाच्या वतीने नगरपरिषद हद्दीतील बचत गटांना फिरता निधी देण्याची तरतूद आहे.शहरात गेल्या वर्षीही निधी देण्यात दिंरगाई झाली होती.यावर्षीही युवक नेते विक्रम ढोणे यांनी हा निधी न दिल्यास आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर घाईगडबडीत महिला दिनी हा फिरता निधी देण्यात आले.यासाठी नगराध्यक्षा शुंभागी बन्नेनवर यांनी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते.शहरातील दहा बचत गटाच़्या महिलांना निधीचे चेक वाटप करण्यात आले. मात्र कार्यक्रमा दरम्यान काही नगरसेवक अचानक आल्याने गोधळ झाला.दरम्यान बचत गटाच्या क्रांती लोकसंचलित साधना केंद्राच्या व्यवस्थापकांना धक्काबुक्की झाल्याने आम्ही चेक परत दिल्याचे महिलांनी सांगितले.

 

आंदोलनाच्या इशारानंतर चेकचे वितरण

 

जत नगरपरिषदेकडून बचत गटाना फिरता निधी देण्यासाठी टाळाटाळ केली जाते.गेल्यावर्षी आवाज उठविल्यानंतर तेरा या वर्षी दहा बचत गटांना या निधीचे वाटप करण्यात आले आहे. बचत गटाच्या यंत्रणेकडून पाच पाच पत्रे नगरपरिषदेला देऊनही कर्तव्यात कसूर करण्यात येत आहे, असा आरोप विक्रम ढोणे यांनी केला.

 

 

 

सर्व नगरसेवकांना निमत्रंण दिले

 

जत नगरपरिषदेचा हा कार्यक्रम महिला दिनी घेतो,यासाठी शहरातील प्रांरभी दहा बचत गटांना या फिराता निधीचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी सर्वांना बोलविण्यात आले होते.मात्र नगरसेवक कार्यक्रमाला आले नाहीत,त्यामुळे आम्ही कार्यक्रम उरकल्याचे नगराध्यक्षा शुंभागी बन्नेनवर यांनी सांगितले.

 

 

जत नगरपरिषद येथे उपस्थित नगराध्यक्षा शुंभागी बन्नेनवर व बचत गटाच्या प्रतिनिधी








 


 




 


Blogger द्वारे प्रायोजित.