Header Ads

माडग्याळ | मध्ये तरूणीची आत्महत्या : परिसरात खळबंळ


 

माडग्याळ, वार्ताहर : माडग्याळ ता.जत येथे बारावीत शिकणाऱ्या तरूणीने राहत्या घरी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.एकता विजय चंदनशिवे वय 18 मुळ गाव सांगली सध्या रा.माडग्याळ असे मयत तरूणीचे नाव आहे. ही घटना रवीवारी तीनच्या सुमारास घडली.या घटनेची नोंद उमदी पोलीसात झाली आहे.पोलीसांनी दिलेली माहिती अशी एकता चंदनशिवे ही मुळची सांगलीची आहे. सध्या ती माडग्याळ येथे आजीआजोबाकडे शिक्षणासाठी राहत होती.ती माडग्याळ येथील ज्यू कॉलेजमध्ये बारावीच्या कला शाखेत शिकत होती.नुकतेच तिने बारावी बोर्डाचे पेपर दिले आहेत.शुक्रवारीचे बारावीचे पेपर संपले आहेत.दरम्यान रवीवारी तिने घरात कोन नसल्याचा फायदा घेत घरातील तुळीला ओढणीने गळफास लावून घेतला.काही वेळानंतर आजी घरात आल्यानंतर घराचा दरवाजा बंद दिसला.तिने एकताला हाक मारण्याचा प्रयत्न केला मात्र आतून प्रतिसाद न आल्याने घराचा दरवाजा तोडल्यानंतर हा प्रकार समोर आला.यांची माहिती उमदी पोलीसांना देण्यात आली. पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचत एकताचा मृत्तदेह खाली उतरवत जत ग्रामीण उत्तरीय तपासणी करून नातेवाईकांच्या ताब्यात दिला.एकताने केलेल्या आत्महत्याचे नेमके कारण समजू शकले नाही.याप्रकरणी आजोबा तुकाराम वाघमारे यांनी फिर्याद दिली.अधिक तपास उपनिरिक्षक नामदेव दांडगे करत आहेत. 


Blogger द्वारे प्रायोजित.