Header Ads

| लेख | आयुष्यरूपी जहाजाचा कॅप्टन मीच


 




 

आयुष्यरूपी जहाजाचा कॅप्टन मी

 

 

सक्षम दुनियेत प्रत्येक माणसाच्या आयुष्याला चिकटलेला एक अविभाज्य घटक म्हणजे यश आणि अपयश अर्थात आपण म्हणतो ना की ध्येय आणि त्यात झालेला पराभव हा प्रत्येकाला पराभव पचवावा लागतोच. जीवनाच्या वाटेवर मार्गक्रमण करणाऱ्या प्रत्येक माणसाचे आपल्या आयुष्यात एक ध्येय असते त्या ध्येयवादी वेडेपणात माणूस वाटचाल करताना अडचणी निश्चित असतात.आयुष्याच्या वाटचालीत कधी यश मिळत तर कधी अपयश कोणतेही कार्य असुद्या त्यात नाविन्यपूर्ण कार्यक्षमता हा एकमेव प्रारंभी सुरवात म्हणून माणूस बघतो तर दुसरीकडे काहीवेळा झालेल्या पराभावाला कवटाळून ध्येय विसरून जाणारी एक पिढीजात असते तर पराभवाचा बदला म्हणून "जैसे थे" रस्ते निवडणारे एक प्रकारी असतात.पायाभूत कामात आपण योग्य वेळ आणि वेळीच उच्च आणि चांगल्या विचाराने कार्य करायला सुरुवात केली तर कार्य सिद्धीस जाते असे म्हणतात.आणि अशी कार्यपद्धत राबवली ना तर नक्की आपण यशाच्या अगदी जवळ पोहचू हे आज पर्यंतचे यश टेक्निक आहे.म्हणजे कसे की आपण अनेकदा यशाच्या अगदी जवळ पोहोचलेलो असतो व आपल्यापैंकी बरेच जण थकून, हरून स्पर्धा मध्येच सोडून देतात आणि अपयशाशी संगत करतात. नेमका हाच (अव)गुण आपल्याला आयुष्यात जिंकण्यापासून लांब ठेवत असतो. हात झटकून मोकळे होतात मात्र जे पराभवानंतरही पुढे प्रयत्न सुरू ठेवतात, कष्ट करत राहतात, प्रयत्नात सातत्य ठेवतात, आशा सोडत नाहीत, ध्येयवादी बनतात तेच पुढे विजेते होतात. ती जिद्द आणि चिकाटीच त्यांना विजयी करत असते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, बर्‍याचदा हा फरक फक्त दहा ते पंधरा टक्क्यांचाच असतो.

बऱ्याच वेळी आपण अनेक विचारांनी ग्रासतो पण काही वेळा सकात्मक विचार असेल तर आपल्या बुद्धिमान वर्तनाला किंवा किंवा ध्येयाला जवळ करण्यासाठी असा मुळात आपले संस्कार,मानसिकता घडवत असतात. आपल्या लहानपणापासून आपल्याला अपयशाबद्दलच जास्त शिकवले जाते. परिणामत: आपले जास्त लक्ष हे अपयशावरच असते. नापास झालो तर, नोकरी मिळाली नाही तर असे अनेक तर-तरच्या नकारघंटा आपल्यातून अवगत झालेल्या असतात. अनेकदा आपण यशातही अपयश शोधत असतो. अपयशी होत राहतो. पण कधी तुम्हाला तुमचे अपयश कधी साजरे करायला शिकवले आहे का? कदाचित नाही. कारण मुळातच अपयश म्हणजे गुन्हा, अपयश म्हणजे वाईट, काही तरी न स्वीकारण्यासारखे, असेच चित्र आपल्या मनात आपल्या संस्कारांमुळे, मान्यतांमुळे तयार झालेले आहे. पण अपयश म्हणजे जिद्दीने उदाहरण आहे. चिकाटीच्या कसोटी आहे. यामुळे अनेक नकारात्मक गोष्टी संपून सकारात्मक गोष्टीला व्यासपीठ मिळत. म्हणून पराभव-अपयश हे जागा करणारा आहे. माझ्या आयुष्यरूपी जहाजाचा कॅप्टन मीच, असे म्हणायला शिका. स्वतःची जबाबदारी स्विकारायला शिका, म्हणजे तुमच्या कर्तृत्वाला एक वेगळी झळाळी प्राप्त होईल. तुमच्या आयुष्यरूपी जहाजाला कुठे नकारात्मक विचारांची, निराशेची छिद्रे पडू नयेत, याची काळजी घेत राहा. हीच छोटी-छोटी छिद्रे, पुढे तुमच्या जहाजाला बुडवायला कारणीभूत ठरतात.लोक काय म्हणतील जर तर बाजूला ठेऊन पुन्हा नव्याने लढा हातात घ्या,यश लोटांगण घालेल हे नक्की. 

 

लेखन : पत्रकार एन.के. 

8806605852




 


 

Blogger द्वारे प्रायोजित.