जत | कोरोना विषाणू रोकण्यासाठी सतर्क रहा | पोलीस,आरोग्य यंत्रणांना सहकार्य करा ; विकास साबळे


जत,प्रतिनिधी : कोरोना या भयंकर आजाराची व्याप्ती वाढत आहे.प्रशासनाच्या निर्देशानुसार जत तालुक्यातील जनतेने 22 मार्च पासून आठवडे बाजार बंद ठेवले आहेत.तसेच शहरातील सर्व बझार,गँरेज,दुकाने,कापड व्यापारी,हाँटेल्स आदींनी सहकार्य केले.ही घटना कौतुकास्पद आहे.या आजाराचा फैलाव रोखणे हे महत्वाचे असून इथून पुढे 31 मार्च पर्यंत सर्व नागरीकांनी स्वतःच्या जीवासाठी कुंटुंबाच्या व इतरांच्यासाठी जनसंपर्क टाळण्याचे आवाहन आरपीआय(A)चे जिल्हाउपाध्यक्ष विकास साबळे यांनी केले आहे.


साबळे म्हणाले की,जत तालुक्यातील नागरिकांनी महत्वाच्या कामाशिवाय घराच्याबाहेर पडू नये.शासन स्तरावरती इतकी मोठी यंत्रणा राबविली जात आहे.त्याला सहकार्य करा व कोरोना संसर्ग टाळणे ही प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे.सदरची घटना ही राष्ट्रीय आपत्ती असून स्वतःचा जीव धोक्यात घालून सर्वासाठी काम करणारे पोलीस,डाँक्टर्स,नर्स,दवाखान्यातील कर्मचारी यांना सहकार्य करण्याचे आवाहन साबळे यांनी केले.