Header Ads

कोरोना | प्राथमिक तपासणीची जत ग्रामीण रुग्णालयात शून्य उपाययोजना | फक्त केसपेपर काढून परत पाठविले |मुंबईतून खलाटीत आलेल्या नागरिकांचे बेहाल  


जत,प्रतिनिधी : कोरोनाच्या प्राथमिक तपासण्याच्या जत ग्रामीण रुग्णालयात उदाशीनता समोर आली आहे.कोरोनाचा प्रभाव असलेल्या मुंबई,पुणेसह बाहेर जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांची फक्त केस पेपर काढून तपासणी न करताच परत पाठविण्याचा धकादायक प्रकार ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी गेलेल्या नागरिकांना अनुभवास आला.ताप किंवा कोरोनाच्या प्राथमिक तपासणीचे साधे यंत्रही तालुक्यातील सर्वात मोठा शासकीय दवाखाना असलेल्या ग्रामीण रुग्णालयात नसल्याचे कर्मचाऱ्यांनी उपस्थित रूग्णांना सांगितले.कोरोनाचा फैलाव वाढत असतानाही ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर उपस्थित नसल्याचा अनुभव खलाटीतील नागरिकांना आला. खोकला ताप असतानाही तुम्हाला कोणती लक्षणे आहेत का ?,तपासणीची अशी कोणती मशीनच नसल्याचे बेजबाबदार उत्तर उपस्थित कर्मचाऱ्याकडून देण्यात आले.एकीकडे बाहेर जिल्ह्यातून आल्याने गावातील लोक गावात तपासणी केल्याशिवाय घेत नाहीत.तर दुसरीकडे ग्रामीण रुग्णालयात तपासणीची यंत्रणा नसल्याच्या बेजबाबदार उत्तरांने नागरिक हवालदिल झाले आहे.नेमकी हीच का कोरोनाबाबतची उपाययोजना असा संतप्त सवाल उपस्थित आरोग्य यंत्रणांना विचारला.            

 

 

तपासणी गरज नसल्याचे उत्तर 

 

खलाटीतील आम्ही काहीजण मुंबई येऊन सोमवारी घरी परतलो आहोत.गावात जाताच तपासणी केल्याशिवाय येऊ नका असे सांगितले. तर ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी गेलो तेथे कोणतीही उपाय योजना अथवा कोरोना तपासणीचा कोणताही कक्ष नाही.डॉक्टरही उपस्थित नव्हते.फक्त केस पेपर काढून तुम्हाला तशी लक्षणे असतीलतर उपचार करू,तपासणीची कोणतीही मशीन नसल्याचे बेजबाबदार उत्तर कर्मचाऱ्यांनी सांगून आम्हाला हाकलून देण्यात आले.आमची कोणतीही तपासणी करण्यात आलेली नसल्याची माहिती मुंबईहून खलाटीत आलेल्या एका नागरिकांने सांगितले.

Blogger द्वारे प्रायोजित.