Header Ads

सांगली | संचारबंदी मोडणाऱ्या जिल्ह्यातील 1655 जणांवर कारवाई | जिल्हा गंभीर मोडवर | काळजी घेण्याचे आवाहन


सांगली : राज्यभरात कोरोना विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.तो प्रादुर्भाव रोकण्यासाठी रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळा, घराबाहेर पडू नका असे आवाहन करण्यात येत आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तातडीच्या उपायायोजनाही काटेकोरपणे राबविण्यात येत आहेत. दिनांक 22 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जतना कफ्यूचे आवाहन केले होते,याला देशभरातून तुफान प्रतिसाद मिळाला.तथापि,सध्याही जिल्ह्यासह राज्यात संचार बंदी आदेश आहेत.या काळात काही लोक अनावश्यक घराबाहेर पडून स्वत:चे आपल्या कुटुंबाचे आरोग्य धोक्यात घालत आहेत.याला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन कडक भूमिका घ्यावी लागत आहे. 
दिनांक 22 मार्च रोजी रात्री 9 ते 24 मार्चच्या सायंकाळी 6 पर्यंत जिल्ह्यात बंदी आदेश मोडणाऱ्या 1655 जणांवर पोलीस कारवाई करण्यात आली  आहे. त्यामध्ये भादविस कलम 188 अन्वये 24 जणांवर व मोटार वाहन केसेस 1631 कारवाई करण्यात आली आहे.त्यांच्याकडून आतापर्यत 4 लाख 22 हजार इतका दंड वसूल करण्यात आला आहे.अशी माहिती पोलीसाकडून देण्यात आली आहे. 


 


Blogger द्वारे प्रायोजित.