Header Ads

घोलेश्वरचे सहाजण आरोग्य विभागाच्या निगराणीखाली


जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात इस्लामपूर कोरोना बाधित कुंटुबियाच्या संपर्कात आल्याच्या संशयावरून घोलेश्वर येथील सहाजणांना आरोग्य यंत्रणेच्या निगरानी खाली ठेवण्यात आले आहेत.त्याशिवाय कुंभारी येथील एकजणही संपर्कात आल्याची चर्चा आहे.मात्र त्यांनी बाधिक कुंटुबियाशी संपर्क केला नसल्याचे आरोग्य विभागाला सांगितले आहे.इस्लामपूर येथील कोरोना बाधित कुंटुबियाच्या संपर्कात जत तालुक्यातील काही जण आल्याने खळबळ उडाली आहे.त्या पार्श्वभूमीवर आरोग्य,पोलिस महसूल विभाग दक्ष झाला असून घोलेश्वर येथील सहाजण इस्लापूर येथे गेले होते,मात्र त्यांचा कोरोना बाधित कुंटुबियाशी संपर्क आला नसल्याचे त्यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले.तरीही खबरदारी  म्हणून आरोग्य विभागाने त्यांना निगरानी खाली ठेवले आहे.संबधित सहाजणांची आमदार विक्रमसिंह सांवत,बिडिओ अरविंद धरणगुत्तीकर,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय बंडगर यांनी त्यांची माहिती घेतली आहे.अन्य जणांची माहिती मिळविण्याचे काम सुरू आहे.


Blogger द्वारे प्रायोजित.