Header Ads

संचारबंदीत चोरटे सक्रीय शहरातील चार बंद दुकाने फोडली 

 

 


जत,प्रतिनिधी : जत शहरातील सोलनकर चौकातील संभाजी मारूती सोनूर यांचे इलेक्ट्रिक दुकान फोडून आंशी हजार रूपयाची ताब्यांची तार चोरट्यांनी लंपास केली.सोनूर यांनी जत पोलीसात तक्रार दिली आहे. शहरातील सोलनकर येथे सोनूर यांचे संत बाळूमामा इलेक्ट्रिक स्टोअर्स हे दुकान आहे.संचारबंदीमुळे ते दुकान अनेक दिवसापासून बंद आहे.रवीवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानच्या स्वेटरचा दरवाजा उचकटून आतील 80 हजार रूपये किंमतीची दोन बंडल ताब्यांची तार पळवून नेहली.दरम्यान संचारबंदीचा फायदा घेत चोरट्यांनी बंद दुकाने फोडण्याचा सपाटा लावला आहे.शहरातील आतापर्यत महिंद्रा ट्रँक्टरचे शोरूम,यशराज बियरबार,नितिन ढाबा अशी अनेक दुकाने फोडून मुद्देमाल लंपास केला आहे.नितिन ढाब्याच्या मालकावर चोरट्यांनी हल्ला करत डोके फोडल्याचे समोर येत आहे. दरम्यान याबाबत पोलीसात गुन्हा दाखल नसल्याने पोलीसांची कारवाई पुढे सरकत नाही.बंद दुकाने फोडण्याचे सत्र सुरू असल्याने दुकानदार भयभीत झाले आहेत.

 

जत शहरातील मारूती सोनूर यांच्या दुकांनाचा चोरट्यांनी उचलेले स्वेटर

Blogger द्वारे प्रायोजित.