जत | तालुक्यातील महिलांच्या प्रगतीसाठी विक्रम फांऊडेशन काम करेल : आ.विक्रमसिंह सांवत

 

जत,प्रतिनिधी : मुलगी शिकली, प्रगती झाली’ हे बोधवाक्य आपण नेहमी वाचतो. मुलीच्या शिक्षणाने समाज सुधारतो.एक शिकलेली मुलगी मोठेपणी 
संपुर्ण कुटुंब सुशिक्षित करते.आता तालुक्यातील महिलांनी पुढे येण्याची गरज आहे.यापुढे महिलाच्या प्रगतीसाठी विक्रम फांऊडेश काम करेल,असे आश्वासन आमदार विक्रमसिंह सांवत यांनी दिले.विक्रम फांऊडेशन व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त महिला बचत गट मेळावा व मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.याप्रंसगी आ.सांवत बोलत होते.प्रांरभी फांऊडेशनचे अध्यक्ष अँड.युवराज निकम यांनी प्रास्ताविक करत फांऊडेशनचा उद्देश व करत असलेल्या कामाची माहिती दिली.यावेळी मीनल सांवत पाटील,वर्षाताई सांवत यांची भाषणे झाली.प्राचार्य एस.एम.ओझा,नगराध्यक्षा शुभांगी बन्नेनवार,महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष सलिमा मुल्ला,माजी सभापती बाबासाहेब कोडग,जिल्हा बँकेचे तालुकाधिकारी प्रभाकर कोळी,के.डी.मुल्ला,संतोष भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

आमदार सांवत पुढे म्हणाले, स्त्री कुटुंबाचा आस असते. सबंध कुटुंब तिच्याभोवती फिरत असते. शिक्षणच स्त्री.उद्धाराचे व समाज परिवर्तनाचे साधन आहे, म्हणून मुलींना शिक्षण देणे फार गरजचे आहे. एक आई आपल्या मुलाचा जसा अभ्यास घेईल तसा कोणत्याही शिकवणी वर्गात घेतला जाऊ शकत नाही. कारण सुशिक्षित आई अभ्यासाबरोबर चांगलं वागणं, सच्चेपणा, प्रामाणिकपणा, प्रेम आणि आणखी कितीतरी संस्कार मुलांवर घडवते. पुस्तकी ज्ञानाबरोबर समाजात वावरण्याचे धडे मुलांना तिच्याकडून मिळतात. सगळ्याच दृष्टीने सशक्त पिढी ती तयार करते. शिक्षणामुळे स्त्रीला आर्थिक स्वातंत्र्य मिळते, जे इतर अनेक स्वातंत्र्यांशी निगडित असते.जत तालुक्यातील महिलांनी पुढे येत उद्योग,व्यवसाय सुरू करावेत.यापुढे विक्रम फांऊडेशनच्या माध्यमातून महिलांसाठी रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करणार असल्याचेही यावेळी आ.सांवत यांनी सांगितले. प्रा.राजेंद्र माने यांनी सुत्रसंचालन केले.

 

 

जत येथे विक्रम फांऊडेशन आयोजित महिलादिनी कार्यक्रमात आमदार विक्रमसिंह सांवत,मीनल सांवत,सलिमा मुल्ला,शुंभागी बन्नेनवर