Header Ads

बाज | बालविवाह | माजी संरपचासह,एकास दोन दिवस पोलिस कोठडी


 




 


 

जत,प्रतिनिधी : अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेवून विवाह लावल्याप्रकरणी बाजचे माजी

सरपंच संजय आनंदा गडदे व नवरदेव देवाप्पा किसन कोंडीकिरे यांना न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

बाज येथील एक बालविवाह केल्याप्रकरणी या दोघाविरुद्ध जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.माजी सरपंच संजय गडदे यांनी या विवाहाला मदत केल्याचे गुन्ह्यात म्हटले आहे.

पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी की,बाज येथील देवाप्पा कोंडोकिरे याचे

गावातीलच मुलीशी प्रेमसंबंध जुळले.मुलगी अल्पवयीन असल्याने त्यांचा विवाह कायद्यानुसार शक्य नव्हता.त्यात या प्रेमप्रकरणाला घरातून विरोध होता,असे असतानाही बाजचे माजी सरपंच संजय गडदे यांनी देवाप्पा यास मदत करत त्या अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेहत बाल विवाह केला.याप्रकरणी मुलीच्या नातेवाईकांनी फिर्याद दाखल केल्यानंतर संजय गडदे व देवाप्पा कोंडीकिरे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.विशेष म्हणजे संजय गडदे हे बाज येथे मंगळवारी होणाऱ्या उरूसाच्या परवानगीबाबत जत पोलीस ठाण्यात आले होते,त्याचवेळी पोलिसानी संजय गडदे व देवाप्पा कोंडीकिरे यांना अटक केली.दरम्यान सोमवारी दोघांना जत न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.दरम्यान या प्रकाराने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

 




 


Blogger द्वारे प्रायोजित.